सोनगीर : जामफळ व कनोली प्रकल्पा अंतर्गत शेतजमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत शेतीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत धरणाचे काम बंद ठेवावे, असे निवेदन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, नायब तहसीलदार तसेच प्रांताधिकाºयांना दिले असून मोबदला मिळावा, अशी मागणी केली आहे.येथील जामफळ धरणाचे काम पहाण्यासाठी मंगळवारी आलेले पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचौळे यांना आुण धुळ्यात नायब तहसीलदार केदारे व प्रांताधिकारी भीमराव दराडे यांना शेतकºयांतर्फे निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, नाणार प्रकल्प, समृध्दी महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आदींतील प्रकल्पग्रस्तांना अंतिम निवाड्यात मिळाली तेवढी रक्कम एकरकमी मिळावी, प्रकल्पग्रस्त दाखले तसेच शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभ मिळावा, भूसंपादन करतांना शेतकºयांना विश्वासात घ्यावे, प्रकल्पाचे काम सुरू असताना शेतात जाणाºया रस्त्यांची तोडफोड होत असून जायला रस्ताच नाही म्हणून मोबदला मिळत नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम थांबवावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.यावेळी शेतकरी दंगल धनगर, राजेंद्र्र महाजन, मुरलीधर चौधरी, आर.के. माळी, सुरेश देशमुख, प्रमोद डेरे, संजय परदेशी, प्रकाश परदेशी, शाम माळी, नंदलाल बडगुजर, अशोक माळी आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
प्रकल्पात गेलेल्या शेतीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम बंद ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 22:02 IST