धुळे : ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, गुरुकृपायोग यापैकी 'गुरुकृपायोग' हा ईश्वर प्राप्तीसाठीचा विहंगम मार्ग आहे.आनंद प्राप्तीसाठी साधना करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे प्रत्येकाने गुरूंना अपेक्षित असे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेच्या कार्यात आपले योगदान देऊ या, असे आवाहन सनातनचे धर्मप्रचारक सदगुरु नंदकुमार जाधव यांनी केले.येथील 'श्रीकृष्ण रिसॉर्ट' मध्ये ‘प्रांतीय हिंदू अधिवेशनाच्या’ समारोपाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेस कल्पेश अग्रवाल, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट उपस्थित होते. जाधव पुढे म्हणाले, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे.या उक्तीप्रमाणे आपणास धर्मकार्य करायचे असेल तर साधनेने आध्यात्मिक बळ निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ईश्वरप्राप्तीसाठी दररोज करावयाचे प्रयन म्हणजे साधना़ सकाम आणि निष्काम असे साधनेचे दोन प्रकार आहेत. साधनेचे अनेक मार्ग आहेत. दुपारच्या सत्रात ‘सामाजिक प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर कसा करावा?’ या विषयी वैभव आफळे यांनी मार्गदर्शन केले. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची मागणी संवैधानिक की असंवैधानिक?’ या विषयावरील परिसंवादाचे सोशल मीडीयावर केलेले प्रसारण दाखवण्यात आले. समारोपीय सत्रात ‘हिंदू संघटकांची आचारसंहिता’ या विषयावर प्रतिक्षा कोरगावकर यांनी तर ‘हिंदु राष्ट्र स्थापनेतील युवकांचे योगदान’ याविषयी प्रशांत जुवेकर यांनी उमार्गदर्शन केले. वंदे मातरमने कार्यशाळेचा समारोप झाला. सूत्रसंचालन निखिल कदम यांनी केले. या कार्यशाळेस ७० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
आनंद प्राप्तीसाठी नियमित साधना करणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 21:51 IST