नियमित १७५ टन कचयाचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:54 AM2019-05-25T10:54:14+5:302019-05-25T10:54:52+5:30

महापालिका : तीन वर्षांसाठी दिला ठेका, शहरात फिरताय ११९ घंटागाड्या

A regular collection of 175 tons | नियमित १७५ टन कचयाचे संकलन

सकाळी विविध भागात कचरा संकलन करण्यासाठी दाखल होणारी घंटागाडी़ 

Next

धुळे : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता कचरा संकलनासाठी घंटागाडी महापालिका प्रशासनाकडून सुरु करण्यात आलेली आहे़ सध्याच्या स्थितीत ११९ लहान मोठ्या वाहनांच्या माध्यमातून सुमारे १५० ते १७५ टन कचºयाचे संकलन केले जात आहे़ त्यामुळे कचºयाची समस्या बºयापैकी संपुष्टात येण्यास मदत मिळत असल्याचे समोर येत आहे़ 
शहराचा विस्तार वाढत असताना त्यात पुन्हा आता नव्याने काही गावांचा समावेश झाला आहे़ परिणामी कचºयाची विल्हेवाट लावणे हा मोठा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर आला होता़ 
स्वच्छतेच्या कामात महापौरांनी घेतला पुढाकार
विद्यमान महापौर चंद्रकांत सोनार यांनी आपल्या पदाचा पदभार  स्विकारल्यानंतर सर्वात प्रथम स्वच्छतेच्या कामात लक्ष केंद्रीत करण्याचे सुतोवाच दिले होते़ त्यानुसार, त्यांनी महापालिकेची संपुर्ण यंत्रणा याकामी लावली होती़ परिणामी स्वच्छतेच्या कामांकडे अधिक लक्ष दिले जाण्यास सुरुवात झाली होती़ 
वेळोवेळी घेतल्या बैठका आणि केले नियोजन
महापौर चंद्रकांत सोनार यांनी प्रशासनाची मदत घेऊन कचरा संकलनासाठी काय करता येईल याकडे लक्ष केंद्रीत केले आहे़ त्यासाठी अधिकाधिक कचरा गोळा व्हावा म्हणून आरोग्य विभागाच्या बैठका घेण्यात आलेल्या होत्या़ त्यांना मार्गदर्शन देखील करण्यात येऊन कचरा संकलनाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत़ 
११९ घंटागाड्यातूनकचºयाचे होतेय संकलन
शहरातील काना कोपºयातून जास्तीत जास्त कचºयाचे संकलन व्हावे यासाठी महापालिकेने सुमारे १७ कोटींचा ३ वर्षासाठींचा ठेका एका कंपनीला दिलेला आहे़ कचरा संकलनासाठी सद्यस्थितीत ७९ घंटागाडी, १० टेम्पो आणि ३० ट्रॅक्टरच्या माध्यमातून दररोज किमान १५० ते १७५ टन कचरा संकलित होत आहे़ एक टन कचरा संकलित झाल्यास ३१८ रुपये दिले जात आहेत़
कचरा संकलनात हवे नागरीकांचे योगदान
महापालिका प्रशासनामार्फत नागरीकांच्या सोयीसाठी घंटागाड्या सुरु करण्यात आलेल्या आहेत़ त्यामुळे नागरीकांनी आपल्या घरात जमा होणारा ओला आणि सुका कचरा इतरत्र न फेकता तो संकलित करुन घंटागाडी आल्यानंतर त्यात टाकणे अपेक्षित आहे़ 
कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी हवे प्रयत्न
दररोज जमा होणारा कचरा आणि त्याची विल्हेवाट हा देखील मोठा प्रश्न आहे़ तरी देखील त्यावर तोडगा काढत प्रशासनाकडून कचरा संकलित केला जात आहे़ सध्या वरखेडी डेपोच्या ठिकाणी जमा होणारा कचरा संकलित केला जात आहे़ त्याच्याच बाजूला आता नव्याने जमा होणारा कचरा संकलित होतोय़ 
नियमित घंटागाडी येणे गरजेचे, अपेक्षा वाढली
शहरातील बहुसंख्य ठिकाणी नियमित घंटागाडी जात असलीतरी काही ठिकाणी घंटागाडी जाण्याचे सातत्य नसल्याची ओरड होत आहे़ त्यामुळे एक ते दोन दिवसाआड नियमित घंटागाडी येणे गरजेचे आहे़ 

तत्कालिन आयुक्तांचा होता पुढाकार
महापालिकेचे तत्कालिन आयुक्त नामदेव भोसले यांनी देखील शहरातील स्वच्छतेकडे आणि पांझरा नदीच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष केंद्रीत केले होते़ त्यांच्या कार्यकाळात दररोज सकाळी महापालिकेच्या कर्मचाºयांची टीम शहरातील विविध भागात जावून तेथील नागरीकांच्या मदतीने स्वच्छतेच्या कामांकडे लक्ष देत होते़ या माध्यमातून सुध्दा दररोज कितीतरी टन कचरा गोळा होत होता़ आजही ही आठवण ताजीच आहे़ स्वच्छतेचा वसा आता घेतला गेला असून घंटागाड्यांच्या माध्यमातून याकडे लक्ष दिले जात आहे़ त्यात सातत्य टिकविण्याची गरज आहे़ 

Web Title: A regular collection of 175 tons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे