शिरपूर : येथे पाणी भरपूर आहे, मात्र शेती नियोजनाचा अभाव व रासायनिक खतांचा वापर अधिक असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही़ त्यासाठी स्वयंपाकावेळी फेकून देण्यात येणारे पाणी व शेणखताचा वापर केल्यास निश्चितच खर्च कमी होवून विषमुक्त शेती करता येईल, असे प्रतिपादन पंजाब येथील शेतीतज्ञ डॉ़जी़एस़ गिल यांनी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले. त्यांनी शिरपूर पॅटर्नबद्दलही गौरवोदगार काढले.बुधवारी १३ रोजी येथील पटेल आॅडिटोरीयम हॉलमध्ये उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्यात ‘विषमुक्त शेती’ विषयावरील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मर्चंट बँकेचे चेअरमन प्रसन्न जैन, शिसाका व्हाईस चेअरमन दिलीप पटेल, के़डी़पाटील, भूमाता ब्रिगेडच्या मनिषा निकम-टिळेकर, माधुरी गुजराथी, डॉ़आऱएल़जैन, राजेश मारवाडी, राजेश अग्रवाल आदी उपस्थित होते़डॉ.गिल हे विषमुक्त शेती व विषमुक्त अन्न ही संकल्पना हाती घेवून काम करीत आहे़ शेतकऱ्यांचा लागवड खर्च ५० टक्के कमी करून उत्पादन २० ते २२ टक्के वाढविणे, जमीन सुपिक कशी राहील, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले़ तसेच कच्चे शेणखत शेतात न टाकता त्यावर प्रक्रिया करावी. त्यामुळे असा प्रयोग केल्यास प्रत्येक शेतकरी घरच्या घरी शेणखताचा कारखाना तयार करू शकतात़ शेतीत नवनवीन उपक्रम राबवून शेतकºयांनी स्वत: त्याविषयी संशोधन करून डॉक्टर व्हावे़ तयार केलेले उत्पन्न स्वत:च विकले पाहिजे, व्यापाºयांना त्या मालाचा भाव करण्याची संधी देवू नका़ जेणेकरून शेतकºयांना अधिक लाभ मिळू शकतो़, असे डॉ.गिल यांनी स्पष्ट करून सांगितले.शेतात विभिन्नता आणा, वेगवेगळे पीक घ्या, मातीची प्रत टिकवा, शक्यतोवर कॅश क्रॉपकडे अधिक लक्ष द्या़ रासायनिक खतांचा अधिक मात्रा मारल्यामुळे शेती खराब होत असल्याचे सांगून कमी खर्चात चांगले पीक व उत्पन्न देखील चांगले येईल, असेही डॉ.गिल यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन एस़व्हीक़े.एम़, एऩएम़आय़एम़ एस़ संचलित सावळदे येथील स्कूल आॅफ अॅग्रिकल्चर सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी व भूमाता ब्रिगेड शाखा शिरपूरच्यावतीने हा शेतकरी मेळावा घेण्यात आला़ सुत्रसंचालन राजेश मारवाडी यांनी केले़
विषमुक्त शेती केल्यास खर्चात कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:22 IST