राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी राजपूत, मोमयाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:49 AM2020-01-13T11:49:09+5:302020-01-13T11:49:26+5:30

 विद्यापीठस्तरीय अविष्कार स्पर्धेत मिळविले सुवर्णपदक

Rajput, Momya's choice for state-level innovation competition | राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी राजपूत, मोमयाची निवड

राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी राजपूत, मोमयाची निवड

Next

आॅनलाइन लोकमत
धुळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड येथे झालेल्या विद्यापीठस्तरावरील अविष्कार स्पर्धेत पदव्युत्तर गटातून पोस्टर प्रेझेंटेशन प्रकारात देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील मोनिका राजपूत, व अक्षता मोमया यांनी सुवर्णपदक पटकावले त्यांची राज्यस्तरीं अविष्कार स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
लोणेरे रायगड येथे झालेल्या विद्यापीठस्तरावरील अविष्कार स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. एम.टेक कॉम्प्युटर शाखेतील मोनिका राजपूत हिने ह्युमॅनिटीज शाखेत, तर एम.टेक सिव्हिल शाखेतील अक्षता मोमया हिने वाणिज्य शाखेत पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. त्यांची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांना प्राचार्य डॉ हितेंद्र पाटील ,अविष्कार स्पर्धेचे विभागीय समन्वयक प्रा. विनोद शिंदे, प्रा.संगीता राजपूत यांचे य्.मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष सुभाष देवरे, प्रा.डॉ.जयश्री भामरे, रजिस्ट्रार प्रा. कुणाल पाटील, प्रा. विजय तवर, आनंद कुलकर्णी यांनी कौतुक केले आहे.

Web Title: Rajput, Momya's choice for state-level innovation competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे