देशातील रेल्वे विभागाचे लवकरच लेखापरिक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:17 PM2019-02-17T12:17:20+5:302019-02-17T12:17:46+5:30

प्रफुल्ल छाजेड : आॅनलाईन अभ्यासक्रमास यापुढे प्राधान्य

Railway audit of the country soon! | देशातील रेल्वे विभागाचे लवकरच लेखापरिक्षण!

देशातील रेल्वे विभागाचे लवकरच लेखापरिक्षण!

Next

लोकमत मुलाखत - देवेंद्र पाठक 
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळ्याचे मुळ रहिवासी सीए प्रफुल्ल प्रेमसुख छाजेड यांची द इन्स्टीट्यूट आॅफ चार्टर्ड अकौटंटस आॅफ इंडिया (आय़सी़ए़आय) दिल्लीच्या २४ व्या परिषदेत वर्ष  २०१९-२० या एक वर्षाकरीता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे़ निवडीनंतर प्रथमच  कौटुंबिक भेटीसाठी ते धुळ्यात आले असता त्यांच्याशी ‘लोकमत’ ने संवाद साधला़ रेल्वे विभागाचे लवकरच लेखापरिक्षण केले जाणार असल्याचे संकेतही त्यांनी बोलताना दिले
प्रश्न : सीएचा अभ्यासक्रम आणि त्यात नवीन बदल याबाबत आपण काय सांगाल? 
उत्तर : सीएच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमांत नव्यानेच बदल करण्यात आला असून २०१७ पासून त्याची अंमलबजावणी देखील सुरु झाली आहे़ अभ्यासक्रमात सुधारणा केली असून ‘ओपन बूक’ पध्दतीचा अवलंब होत आहे़
प्रश्न : देशात सीए विद्यार्थ्यांच्या संख्येत घट आहे का? त्याचा काही परिणाम जाणवतो का?
उत्तर : सीए क्षेत्रात सध्या ७ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी कार्यरत असून हे प्रमाण काही कमी नाही़ आवड आणि गांभिर्य असलेले विद्यार्थीच या क्षेत्राकडे वळतात़ अजुन तरी कोणताही परिणाम जाणवत नाही़ 
प्रश्न : या क्षेत्रात काही बदल अपेक्षित आहे का? बदल होत असल्यास त्याचे स्वरुप कसे असणार?
उत्तर : सीएच्या क्षेत्रात अजून तरी कोणत्याही प्रकारचा बदल अपेक्षित नाही़ असोसिएशन काही लहान नाही़ संसदेच्या कायद्यानुसार स्वातंत्र्याच्याही अगोदर त्याची स्थापना झालेली आहे़ असोसिएशनच्या काही जबाबदाºया आणि काही कर्तव्य निश्चित आहेत़ बदल झाला तर स्वरुप सुध्दा बदलेल़ 
प्रश्न : जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याकडे वळावे, यासाठी काही उपाययोजना आहेत का? 
उत्तर : सीएच्या करियर कौन्सिल कमिटीतर्फे १६४ शाखा आहे़ सीए स्वतंत्र कोर्स असून आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देखील देण्याचा मानस आहे़ 
रेल्वे विभाग ठरणार लक्ष्य
देशाच्या इतिहासात प्रथमच रेल्वे विभागाचे स्वतंत्रपणे सीए असोसिएशनच्या माध्यमातून लेखापरिक्षण केले जाणार आहे़  डबल अकाऊंटचा त्यात समावेश असेल़ अर्थात उत्पन्न  आणि खर्च याचा ताळमेळ पाहण्यात येणार आहे़ ही सर्वात मोठी बाब असल्याने त्याकडे लक्ष आहे़ 
विदेशातही कार्यरत 
१ जुलै १९४९ रोजी सीए असोसिएशनची स्थापना झाली आहे़ टप्प्या-टप्प्याने त्यात वाढ होत गेल्याने देशातच नाहीतर विदेशात देखील असोसिएशनचे काम सुरु आहे़ सद्यस्थितीत ३ लाख सीए आहेत़ ७ लाखांपेक्षा अधिक सीएचे विद्यार्थी आहेत़ देशात १६४ शाखा असून  ३३ विदेशातही कार्यरत आहेत़ देशात ५ रिजनल कार्यालय सुरु आहे़ असोसिएशनचे देशपातळीवर ३२ सदस्य असून ८ केंद्र सरकारच्या विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी असे ४० सदस्य आहेत़ 
सीए अभ्यासक्रमास आवश्यक तो बदल करुन त्याची अंमलबजावणी केली जात आहे़ विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेतले जाईल़  - प्रफुल्ल छाजेड

Web Title: Railway audit of the country soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे