शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

उत्पन्न वाढीसाठी रेल्वे प्रशासनाचा नवा फंडा; जामनेर, अकोला स्टेशनच्या मोकळ्या जागेत होणार ‘बॉक्स क्रिकेट’ची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 21:43 IST

यासाठी तीन जणांनी निविदा भरून बॉक्स क्रिकेटची सुविधा देण्याची तयारीही दर्शविली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचींही करमणूक होणार असून, रेल्वे प्रशासनालाही उत्पन्न मिळणार आहे.

धुळे : मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे प्रशासनाने वर्षानुवर्ष पडलेल्या मोकळ्या जागांचा उपयोग रेल्वेच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पहिल्या टप्प्यात जामनेर व अकोला स्टेशनच्या मोकळ्या जागेत ‘बॉक्स क्रिकेट’ (टर्फ पॉवर प्ले) ची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तीन जणांनी निविदा भरून बॉक्स क्रिकेटची सुविधा देण्याची तयारीही दर्शविली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचींही करमणूक होणार असून, रेल्वे प्रशासनालाही उत्पन्न मिळणार आहे.

‘बॉक्स क्रिकेट’ ही संकल्पना सध्या मोठ्या शहरांमध्येच दिसून येते. यात कमी जागेत चारही बाजूंना जाळी लावून, आतमध्ये क्रिकेट खेळता येते. क्रिकेटचा सराव करण्यासाठी अनेक खेळाडू यामध्ये क्रिकेट खेळण्याला प्राधान्य देत असतात. त्या दृष्टिकोनातुन भुसावळ रेल्वे प्रशासनाने नवोदित खेळाडूंसाठी तसेच प्रवाशासांठी रेल्वेच्या मोकळ्या जागेत ‘बॉक्स क्रिकेट’ची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भुसावळ विभागातील जामनेर, अकोलाधुळे स्टेशनसाठी  इच्छुकांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये जामनेर येथे ‘बॉक्स क्रिकेट’ सुरू करण्यासाठी एका व्यक्तीने निविदा भरली असून, अकोल्यासाठी दोन जणांनी निविदा भरली आहे. तर धुळे स्टेशनसाठी कुणीही निविदा भरली नसल्याचे सांगण्यात आले.

मक्तेदाराला भाडेतत्त्वावर चालवायला देण्यात येणार... -रेल्वेच्या मोकळ्या तयार करण्यात येणारे ‘बॉक्स क्रिकेट’ हे मक्तेदाराच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर चालविण्यात येणार आहे. मक्तेदाराकडून वर्षाचे एकत्रित भाडे घेण्यात येणार असून, एका मक्तेदाराला पाच वर्षांसाठी हे चालवायला दिले जाणार आहे. दिवसा व रात्रीदेखील ‘बॉक्स क्रिकेट’ सुरू राहणार असून, ‘बॉक्स क्रिकेट’चे शुल्क संबंधित मक्तेदार हा तासाप्रमाणे आकारणार आहे. यामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी लागणारे सर्व साहित्य, सुविधा मक्तेदाराकडून पुरविण्यात येणार आहेत.

धुळ्याला स्टेशनला प्रतिसाद नाही -भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सुरुवातीला धुळे रेल्वे स्टेशनवर रेल्वे म्युझियम सुरू करण्यासाठी दोन वेळा निविदा काढल्या. मात्र, तरीदेखील प्रतिसाद मिळाला नाही. तर आता ‘बॉक्स क्रिकेट’साठी देखील जामनेर, अकोलासोबत धुळे स्टेशनसाठी निविदा काढण्यात आली होती. यासाठी देखील प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.

भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे जामनेर, अकोला व धुळे स्टेशन परिसरातील मोकळ्या जागेत ‘बॉक्स क्रिकेट’ सुरू करण्याबाबत निविदा काढण्यात आल्या होत्या. यामध्ये जामनेर व अकोल्यासाठी निविदेला प्रतिसाद मिळाला असून, धुळ्यासाठी प्रतिसाद मिळालेला नाही. या ‘बॉक्स क्रिकेट’मध्ये कुणालाही खेळता येणार असून, मध्य रेल्वेतील ही पहिलीच संकल्पना ठरणार आहे.- डॉ. शिवराज मानसपुरे, विभागीय वरिष्ठ वाणिज्य प्रबंंधक, भुसावळ रेल्वे विभाग 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेDhuleधुळेAkolaअकोला