शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सुविधा पुरवा अन्यथा तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:23 IST

समस्याग्रस्त जाधवनगरवासीयांचा इशारा : शिंदखेडा मुख्याधिकाºयांना दिले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : वीस वर्षांपासून अस्तित्त्वात आलेल्या प्रभाग १३ मधील  जाधव नगर हे तत्कालीन ग्रामपंचायत व नगरपंचायत मार्फत देण्यात येणाºया मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या येथील राहिवासी नागरिकांनी  नगर पंचायतीत धाव घेऊन मुख्याधिकाºयांंना जाब विचारला. यावेळी नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त करत तत्परतेने सुविधा पुरवा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.याप्रसंगी रहिवाशींनी उपस्थित नगरसेवकांसमोर आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी मुख्याधिकारी अजित निकत यांना मागणीचे निवेदन दिले. उपनगराध्यक्ष भिला पाटील, विरोधी गटनेते नगरसेवक सुनील चौधरी, नगरसेविका मीरा पाटील, नगरसेवक दीपक अहिरे, उदय देसले आदी उपस्थित होते. यावेळी निवेदनाची प्रत नगराध्यक्षा रजनी वानखेडे, प्रभाग १३ मधील नगरसेविका मीरा पाटील, विरोधी पक्ष नेते सुनील चौधरी यांना देण्यात आली. यावेळी मागण्यांची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.मुख्याधिकारी निकत व उपनगराध्यक्ष भिला पाटील यांनी त्वरित जाधव नगरात गटारी, काँक्रीट रस्ते, खुल्या जागेत सुशोभीकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. निवेदनात म्हटले आहे की, वीस वर्षापासून जाधव नगर हे रहिवासी वस्ती अस्तिवात आहे. पण पंधरा वर्षापासून समस्यांची मागणी करीत आहोत. जाधव नगर मधील रहिवासी वेळोवेळी आपले नगरपंचायत कर भरत असतात. तरीही रस्ते, गटारी या मुलभूत समस्येपासून रहिवासी वंचित आहेत. अनेकवेळा निवेदन देवून आमच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात विविध योजने अंतर्गत विकासाची कामे सुरु आहे. यात जाधव नगरकडे दुर्लक्ष होत असताना दिसत आहे.       तुम्हास देण्यात येत असलेले हे निवेदन शेवटचे समजून आमच्या मागणीची तातडीने दखल घ्यावी. अन्यथा आपल्या नगर पंचायत कार्यालयासमोर आम्ही रहिवासी पुरुष, महिला यासह आंदोलन करण्याचा मार्ग अवलंबिण्यात येईल असा इशारा देण्यात आला. निवेदन देते वेळी मोहन परदेशी, किशोर सोनवणे, सुनील पाटील, अतुल पाटील, जितेंद्र मेखे, पंकज शाह, मिलिंद पाटील, भरत बोरसे, कामिनी बोरसे, कल्पना मेखे, सुनंदा चौधरी, सुवर्णा नेरपगार, उज्वला मेखे, ज्योती खोंडे, पवार यांच्यासह मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते.मुख्याधिकाºयांनी पाहणी करुन दिल्या सूचनापावसामुळे जाधव नगरमध्ये झालेल्या रस्त्यांची दयनीय अवस्था याविषयी राहिवश्यांनी आपल्या संतप्त भावना मुख्याधिकारी यांच्या जवळ व्यक्त केल्या यांची  मुख्याधिकारी निकत यांनी ताबडतोब दखल घेत जधावनगर मधील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी  बांधकाम अभियंता ईश्वर सोनवणे, उपनगर अध्यक्ष भिला पाटील, नगरसेविका मीरा पाटील , प्रवीण माळी आदी उपस्थित होते. यावेळी निकत यांनी  बांधकाम अभियंता व कर्मचारी यांना सूचना करत लगेच रस्त्यावरची काळी माती काढून मुरूम टाकण्यास सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे