धुळ्यात बसपातर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 09:04 PM2020-07-07T21:04:52+5:302020-07-07T21:05:43+5:30

विविध मागण्या : मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत द्या

Protests by bus in Dhule | धुळ्यात बसपातर्फे निदर्शने

dhule

Next

धुळे : बहुजन समाज पार्टीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली़
कोरोना बाधितांना एक लाख रुपये तर मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत द्यावी, दलित-आदिवासींवरील अत्याचाराचे खटले जलदगती न्यायालयात चालवून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, इंधनाचे दर कमी करावे, तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, शिक्षण शुल्क माफ करावे, कर्जाचे सहा महिन्याचे हप्ते माफ करावे, वाहन चालक, मालकांना आर्थिक मदत करावी, डिसेंबरपर्यंत मोफत धान्य द्यावे, कोरोनामुळे ठप्प झालेल्या लघु उद्योगांसह बांधकाम मजुर, बारा बलुतेदार यांना विशेष अनुदान द्यावे, प्रत्येक जिल्ह्यात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करावी, शेतकऱ्यांना अनुदानासह पिक कर्ज उपलब्ध करुन द्यावे, बोगस बियाणे कंपन्यांविरुध्द गुन्हे दाखल करावे आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले़
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद सैंदाणे, महासचिव रमेश वानखेडे, उपाध्यक्ष संजय अहिरे, जिल्हा प्रभारी संजय सोनवणे, मिलिंद बैसाणे, सचिव साहेबराव अहिरे, अ‍ॅड़ सतीष अहिरे, विजयराव मोरे, कोषाध्यक्ष संतोष मोरे, सचिव भाऊसाहेब पवार, शिरपूर शहराध्यक्ष सतीष थोरात, शहराध्यक्ष विशा वाघ, जिल्हा सचिव आतिष आखाडे, शहर कोषाध्यक्ष ईश्वर जाधव, योगेश सोनवणे, विजय भामरे, कैलास मोरे, युसूफ शेख, राजु संदानशिव, मनोज सोनवणे, बबलु सोनवणे, अनिल कांबळे, आनंद अल्हाट आदी उपस्थित होते़ मास्क लावून आणि सुरक्षीत अंतर ठेवून आंदोलन केले़

Web Title: Protests by bus in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे