माध्यमिक विद्यालय, उडाणे
उडाणे, ता.धुळे येथील माध्यमिक विद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंतीनिमित्ताने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.डी. पाटील होते. ए.एम. पाटील, आर.व्ही. पाटील, एस.के. बागूल, पी.एम. पावरा, एम.झेड. शिंदे, पी.व्ही. महाजन, के.पी. पाटील, जे.डी. गर्दे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यानिमित्त आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचे कामकाज सांभाळले. अश्विनी संतोष दासनूर हिने मुख्याध्यापक तर पर्यवेक्षक म्हणून विनोद संतोष हालोर यांनी जबाबदारी पार पाडली. अध्यापनानंतर विद्यार्थी शिक्षकांनी अनुभव कथन केले. सूत्रसंचालन श्रद्धा दिलीप पाटील व मयुरी राजेंद्र बागूल या विद्यार्थिनींनी तर आभार गुंजन संजय बागूल हिने मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक व कर्मचारी प्रमोद पाटील, योगेश पाटील यांनी परिश्रम घेतले.
अहिर शिंपी पंच संस्था, धुळे
धुळे शहरातील अहिर शिंपी पंच संस्थेतर्फे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या वेळी संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या मूर्तीचे व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते समाजातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणे तर प्रमुख अतिथी म्हणून अहिर शिंपी पंच संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, महिला मंडळ उपाध्यक्ष सुषमा शिंदे, उमेश भांडारकर, संगीता सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी राज्य संघटक सुहास जगदाळे, जिल्हा संघटक गणेश सोनवणे, सचिव शितल कापुरे, सदस्या संगीता जगदाळे, वैशाली सोनवणे, उपाध्यक्ष रमेश शिरसाठ, खजिनदार नाना टेलर, शाम दलाल, नागेश सावळे, संजय कापुरे, प्रा.सुषमा सावळे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन गणेश सोनवणे यांनी तर आभार शितल कापुरे यांनी मानले. समाजात प्रथमच शिक्षक दिनाचा उपक्रम राबविण्यात आल्याने शिक्षकांनी संयोजकांचे आभार मानले.
सिंधूरत्नज स्कूल, धुळे
धुळे शहरातील सिंधूरत्नज एस.व्ही.सी. (महात्माजी) इंग्लिश स्कूलमध्ये डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेचे चेअरमन सुरेश कुंदनाणी यांच्या हस्ते डॉ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कुंदनाणी यांनी मनोगत व्यक्त करून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक आमीर खान, उपमुख्याध्यापिका शालिनी मंदान, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन भावना बागले यांनी केले.