शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
4
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
5
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

भाव नसल्याने शेतातील डाळिंब काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:37 AM

स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : नंदुबार तालुक्यातील वरुळ, बामडोर, शिंदे, समशेरपूर आदी शेतशिवारात डाळिंबाचे भाव घसरल्याने शेतकºयांकडून ही झाडे काढण्यात येत आहेत़ उत्पन्नापेक्षा त्यांना खर्चच अधिक येत असल्याचे संबंधित सुमारे २५ शेतकºयांकडून ही कार्यवाही करण्यात आली आाहे़ डाळिंबाला भावही नगन्य असल्याने शेतकºयांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़जाणकार शेतºयांच्या म्हणण्यानुसार डाळींबची शेती करण्यासाठी एकरी ९० हजार रुपयांचा खर्च होत असल्याचे सांगण्यात आले़ तसेच याचे उत्पन्न लागवडीपासून सुमारे दोन वर्षांनंतर मिळत असते़ त्याच प्रमाणे ज्या वेळी डाळिंबाच्या झाडाला बहर येतो तेव्हाही बºयापैकी पैसा खर्च करावा लागत असतो़ त्या मानाने स्थानिक तसेच इतर लगतच्या बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकºयांना उत्पादनाचा खर्च काढणेही शक्य होत नसल्याची व्यथा शेतकºयांकडून मांडण्यात आली आहे़ सध्या सुरत, नाशिक, मालेगाव आदी बाजारपेठेच्या ठिकाणी १५० ते ६०० रुपये प्रति कॅरेट डाळींबाला भाव उपलब्ध आहेत़ एका कॅरेटमध्ये सुमारे २२ किलो डाळिंब असल्याचे सांगण्यात आले़संबंधित परिसरात बहुसंख्य शेतकºयांनी डाळिंबाची झाडे लावली होती़ काही कालावधीने का होईना परंतु डाळिंबाला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकºयांना होती़ परंतु बाजारपेठेत डाळिंबाला भाव नसल्याने शतकºयांची आर्थिक हानी होत   होती़ त्यातच स्थानिक बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकºयांना आपल्या मालाची इतर ठिकाणी निर्यात करावी लागत असल्याने त्यातही मोठ्या  प्रमाणात पैसा खर्च होत असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकºयांनी डाळींबाची झाडे काढून त्या ठिकाणी इतर पीक घेण्याला आता पसंती दिली असल्याचे चित्र दिसून येत आहे़ परिसरातील सुमारे २५ शेतकºयांनी टॅक्टरच्या साहाय्याने आपल्या शेतातील डाळिंबाची झाडे काढणीला सुरुवात केली आहे़ दरम्यान, इतका खर्च होऊनही त्याचा योग्य मोबदला मिळाला नसल्याने शेतकºयांची यात मोठी आर्थिक हानी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे़ तसेच यामुळे अनेक शेतकºयांचे आर्थिक गणितदेखील कोलमडले आहे़ डाळिंबावर हवामानाचाही परिणाम - कृषी साहाय्यकडाळिंबासाठी येथील हवामान योग्य नसल्याचे कृषी साहाय्यक सुधीर वाघमारे यांनी सांगितले डाळिंबाच्या लागवडीसाठी निचरा होणारी मुरमाळ जमिन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले़ काळ्या जमिनीत पाण्याचा लवकर निचरा होत नसल्याने याचा परिणाम पिकावर होत असतो़  त्याच बरोबर माती-पाणी परिक्षणाबाबतही शेतकरी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करीत असल्याने याचा विपरित परिणाम डाळिंबावर झाला आहे़ शिवाय काही भागात डाळिंबावर तेल्या रोग येत असतो़त्यामुळे झाडे वाळतात़ या सर्वांमुळे डाळिंबाचा दर्जा खालावतो व भाव मिळण्यास अडचणी येतात़