धुळे : एसआरपी कॅम्पच्या भिंतीलगत दारु विकणाऱ्या शनिनगरातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ त्याच्याकडून कारसह सव्वा लाखांची दारु जप्त करण्यात आली़आप्पा उर्फ किरण यशवंत पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे़ सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास किरण पवार हा एसआरपी कॅम्पच्या भिंतीच्या आडोश्यालगत एका घराच्या मागे दारु विकत होता़ त्याच्याकडील एमएच १९ एएक्स ०८४२ क्रमांकाच्या इंडीका गाडीत विविध कंपन्यांची दारु आढळून आली़ पोलिसांनी १ लाख २५ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ धुळे तालुका पोलिसांनी संशयित किरण पवार विरुध्द गुन्हा दाखल केला आहे़ घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोरे करीत आहेत़
पोलिसांनी पकडली सव्वा लाखांची दारु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 22:20 IST