शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस असल्याचे सांगून धुळ्यात वृद्धाला दोघांनी लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 15:12 IST

५० हजाराचे दागिने घेऊन चोरट्यांचा पोबारा

ठळक मुद्देदोघांनी वृद्धाला पोलीस असल्याचे सांगून थांबविलेवृद्धाच्या हातातील गळ्यातील दागिने काढायला लावले दागिने घेऊन चोरटे पसार

आॅनलाइन लोकमतधुळे : पोलीस असल्याचे सांगून, सोन्याचे दागिने आमच्याकडे द्या आम्ही सुरक्षित ठेवतो असे सांगून ७४ वर्षीय वृद्धाकडील ५० हजार रूपये किंमतीचे दागिने लंपास केल्याची घटना ५ रोजी सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास देवपूर एनसीसी कार्यालयासमोरील रस्त्यावर घडली. याप्रकरणी देवपूर पोलीस स्टेशनला दोन अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.शहरातील मंगलमूर्ती कॉलनीत राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी भटू हरी सोनार (७४) हे ५ मे रोजी सकाळी मोटारसायलने (क्र. एमएच १८- एएम ७१७४) दूध घेऊन घरी जात होते. देवपुरातील एनसीसी कार्यालयासमोरील सार्वजनिक रोडवर  दोन अज्ञातांनी त्यांना थांबवित, आम्ही पोलीस आहोत असे सांगून त्यांचे कार्ड दाखविले. त्यांनी सोन्याचे दागिने आमच्याकडे द्या आम्ही सुरक्षित ठेवतो असे सांगितले. त्यानुसार भटू सोनार यांनी २० हजार रूपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १० हजार रूपये किंमतीची ७ ग्रॅमची अंगठी, तसेच २० हजार रूपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन काढून त्या दोघांजवळ दिली. दागिने मिळाल्यानंतर ते रूमालात ठेवत तुमच्या दुधाच्या पिशवीत ठेवतो असे त्यांनी सांगितले. मात्र दागिने पिशवीत न ठेवता त्या अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला. या सर्व दागिन्यांची किंमत ५० हजार रूपये एवढी आहे.याप्रकरणी भटू सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवपूर पोलीस स्टेशनला दोन अज्ञात चोरट्यांविरूद्ध भादवि कलम १७०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक ए.आर. पटेल करीत आहेत. 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा