शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी वाहन पकडून पोलिसांनी 9 बाल मजुरांची केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 14:39 IST

बोराडी : अवैधरित्या खाजगी वाहतूक करणारे वाहन पकडून त्यात शेतीच्या कामासाठी जाणारे ९ बाल मजुरांची शिरपूर वाहतूक पोलीसांनी सुटका ...

बोराडी : अवैधरित्या खाजगी वाहतूक करणारे वाहन पकडून त्यात शेतीच्या कामासाठी जाणारे ९ बाल मजुरांची शिरपूर वाहतूक पोलीसांनी सुटका केली व त्यांना सुखरुप आपल्या घरी पोहोचविले. तसेच अवैध वाहतूक करणारऱ्या वाहन चालकाविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.वाघाडी येथे बाळदे फाट्यावर क्षमतेपेक्षा जास्त मजुर वाहतूक करणाऱ्या वाहनावर शहर पोलीस वाहतूक शाखेतफर्फे कारवाई करण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास अवैध प्रवासी वाहतूक करणारे मजुरांचे वाहन पोलीसांनी अडविले. वाहनावर आत तसेच टबवर तसेच वाहनांच्या बाहेर लटकून प्रवास करीत होते.पोलिसांनी वाहन थांबवून सर्वांना उतरवून वाहन ताब्यात घेतले. सदर वाहनात १९ पेक्षा जास्त मजूर वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. यात १० ते १५ वयोगटातील नऊ बाल मजूर आढळून आले. या सर्व बाल मजुरांची सुटका करुन त्यांना त्यांच्या घरी सोडविण्यात आले. सदर वाहनावर मोटार अधिनियम ६६/१९२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.तोरणमाळ घाटाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनातर्फे विशेष मोहीम राबवली जात आहे. सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे हेड कॉन्स्टेबल नारायण पाटील,पोकॉ ठाकरे,पोकॉ रवींद्र पावरा यांनी केली.यावेळी बघणाऱ्यांची गर्दी जमा झाली होती.