आॅनलाइन लोकमतशिरपूर जि.धुळे :- तालुक्यातील थाळनेर परिसरातील मांजरोद, नांथे परिसरात पोलिसांनी जुगार अड्डयावर धाड टाकून सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तर दोन्ही घटनेत ११ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, तीनजण फरार झाले आहेत.९ रोजी सायंकाळी ७:५५ वाजेच्या सुमारास मांजरोद ता.शिरपूर गावातील नवीन प्लॉट जवळील काटेरी झुडपात सुकलाल आनंदा कोळी,मुकूंदा भिवसन शिरसाठ, विजय दगडु आखडमन, दिलीप धोंडु कोळी, कपिल नरेंद्र राजपूत,दिलीप रजेसिंग राजपूत, भागवत भिला भिल (सर्व रा.मांजरोद) हे जुगार खेळत होते. थाळनेर पोलीसांनी छापा टाकून ३१ हजार६०० रुपये रोकड व मोटर सायकलसह जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले यावेळी सुकलाल कोळी घटनास्थळा वरुन पळून गेला. तर दि ९ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास नांथे शिवारात असलेल्या फॉरेस्ट च्या वनीकरणात काटेरी झाडाझुडुपात राकेश शिरसाठ, मोहन भिल, गुलाब भिल, मनोहर पाटील, राजु कोळी, सुनिल चैत्राम पाटील, अशोक रावा पाटील, गनी भिका बागवान,रमेश पाटील (रा.वढोदा चोपडा) हे ९ जण जुग्गार खेळत असतांना थाळनेर पोलिसांनी छापा टाकत मोटारसायकल, मोबाईल व रोकडसह ९७ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला यावेळी दोन जण पळून गेले. इतरांना ताब्यात घेण्यात आले. यात ५ जण चोपडा तालुक्यातील रहिवासी आहेत.
जुगार अड्डयावर धाड टाकून सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:01 IST