धुळे : जुगार अड्डय़ावर छापा टाकून पकडलेल्या नातेवाइकाला सोडविण्यासाठी एका पोलीस कर्मचा:याने अधिका:याशी वाद घातला़ त्यामुळे दोघांमध्ये हमरीतुमरी झाली़ अखेर पोलीस निरीक्षकाच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला़ हा प्रकार बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) शाखेत घडला़ या प्रकाराची पोलीस वतरुळात दिवसभर चर्चा होती़ एलसीबीच्या कार्यालयात 18 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका पोलीस हेड कॉन्स्टेबलने शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे येथे जुगार अड्डय़ावर छापा टाकून पकडलेल्या नातेवाइकाला सोडून द्यावे, या कारणावरून एलसीबीच्या एका सहायक पोलीस अधिका:याशी वाद घातला़ त्यानंतर दोघांमध्ये हमरीतुमरी झाली़ दमदाटीही करण्यात आली़ या वेळी कोणीही वरिष्ठ पोलीस अधिकारी नसल्यामुळे वाद वाढत गेला़ अखेर वादाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक देवीदास शेळके हे कार्यालयात आल़े त्यांनी मध्यस्थी करत वाद मिटविला़ नंतर पोलीस कॉन्स्टेबल व सहायक पोलीस निरीक्षकाला इतर कर्मचा:यांसोबत घरी सोडण्यात आल़े तर संबंधित पोलीस कॉन्स्टेबल शहर पोलीस ठाण्यात तक्रारदेखील देण्यास गेला होता़ मात्र शहर पोलीस ठाण्याच्या अधिका:याने त्या कॉन्स्टेबलला वरिष्ठ अधिका:याचे लेखी आणण्यास सांगितल़े नंतर दोघांचा वाद आपसात मिटल्याचे समजत़े
पोलीस अधिकारी व कर्मचा:यामध्ये हमरीतुमरी
By admin | Updated: January 20, 2017 00:12 IST