शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
4
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
5
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
6
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
7
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
8
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
9
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
10
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
12
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
13
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
14
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
15
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
16
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
17
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
18
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
19
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
20
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात आयोजित कवी संमेलनात कवितेतून दिला एकात्मतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 16:20 IST

राज्यस्तरीय कवी संमेलन : अंकुर संघ व कवियत्री बहिणाबाई चौधरी कवीकट्टातर्फे आयोजन

ठळक मुद्देराज्यातील २०० कवींची उपस्थितीराज्यस्तरीय कवी संमेलनासाठी शहरातील ८० तर राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून १२० कवींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी अंकूर साहित्य संघाच्या धुळे जिल्हाध्यक्षा मीना भोसले, क. उ. संघवी, संजय धनगव्हाळ, मुरलीधर पांडे, दीपक सूर्यवंशी, अरूणा देशमुख, सुनील बोरसे, गणेश पाटील, चंद्रशेखर कासार यांनी परिश्रम घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :  अंकुर साहित्य संघ व कवियत्री बहिणाबाई चौधरी कवीकट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित पहिल्या राज्यस्तरीय कवी संमेलनात उपस्थित कवींनी स्वरचित कविता सादर करीत राष्टÑीय एकात्मतेचा संदेश दिला. शहरातील राजवाडे संशोधन मंडळासमोरील संत अ‍ॅन्स कॅथोलिक चर्चमधील सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रारंभी संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक पापालाल पवार, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे संचालक राजवर्धन कदमबांडे, अंकूर साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष अरविंद भोंडे, सचिव तुळशीराम बोबडे, विजय पाटील (नंदुरबार), भाजपाचे प्रवक्ते संजय शर्मा, ज्येष्ठ कवी श्यामकांत निकम उपस्थित होते. याप्रसंगी संजय शर्मा यांनी ‘शेतकरी व राष्टÑीय एकात्मता’ या विषयावर कविता सादर केली. तर नितीन मोघल ‘माहेरची आठवण’, रोहिदास पाटील ‘महामानव’, राजेंद्र जाधव ‘अहिराणी कुटुंब’, गुलाबराव मोरे ‘जशाच तसे’, अविनाश राठोड ‘पीक’ आदी कविता सादर करीत येथे उपस्थित रसिकांची मने जिंकली. सूत्रसंचालन राम जाधव, राजेश सोनार, अरूणा देशमुख, दत्तात्रय कल्याणकर आदी उपस्थित होते. ग्रंथदिंडीने वेधले लक्ष संमेलनाच्या उदघाटनापूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात आली. संत अ‍ॅन्स कॅथोलिक चर्चपासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. त्यानंतर ही ग्रंथदिंडी गुरू शिष्य स्मारकमार्गे पुन्हा चर्च परिसरात आली. चार कवीता संग्रहाचे प्रकाशनकार्यक्रमात कवी राम जाधव यांचा ‘आरसा’, कवी राजेश सोनार ‘चांदोबाचा दिवा’, कवी दीपक सूर्यवंशी ‘सृष्टी’, कवी सुनील बोरसे ‘मास्तर’ यांच्या कवीता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी राजवर्धन कदमबांडे, राम भदाणे यांनी मनोगत व्यक्त केले.