धुळे - निसर्गमित्र समितीतर्फे भोकर येथील समशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले, तसेच पाच वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.
महापालिकेच्या माध्यमातून २०१ रोपे उपलब्ध झाली होती. ते रोपेही यावेळी लावण्यात आली. यावेळी नगरसेविका विमल पाटील, नरेश चौधरी नगरसेवक रंगनाथ ठाकरे, उद्योजक किशोर डियालाणी, मधुकर निकुंभे, निसर्गमित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, जिल्हाध्यक्ष डी. बी. पाटील, गोपीचंद पाटील, राज्य संघटक प्रभाकर सूर्यवंशी, एम वाय. पाटील आदी उपस्थित होते. उल्लेखनीय कामाबद्दल सामाजिक कार्यकर्ते किशोर देवरे, मंगलदास पाटील, गोपीचंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी योगेश गोरे, विश्वासराव पगार, विजय वाघ, समितीचे तालुकाध्यक्ष मनोज पाटील, प्रा. एच. ए. पाटील, शिवाजी बैसाणे, ईश्वर बैसाणे, भरत सैंदाणे, राजेंद्र ढोडरे, वैभव पाटील, हर्षल महाजन, राजेंद्र माळी, मोनू पाटील, किशोर अहिरे, डॉ. सुमित चौधरी, प्राचार्य एस. टी. चौधरी, प्रा. डॉ. पी. एस. गिरासे, डॉ. विनोद भागवत आदींनी प्रयत्न केले. राज्य महासचिव संतोष पाटील यांनी सूत्रसंचालन, तर विश्वास पगार यांनी आभार मानले.