शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

फार्मसीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, तापी नदीपात्रात आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 20:00 IST

तीन दिवसापूर्वी रुममधून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरु असतांना तापी नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

धुळे - शिरपूर येथे एम. फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तो तीन दिवसापासून रुममधून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरु असतांना तापी नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नांद्रा येथील राहुल नामदेव पाटील वय २२ हा शिरपूर येथील आर. सी पटेल फार्मसी महाविद्यालयात एम. फार्मसी च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. गेल्या चार वर्षांपासून तो शिरपूर येथे शिक्षण घेत होता. दि २१  रोजी त्याचे एम. फार्मसीची परीक्षा होती. मात्र तो आजारी असल्याने त्याने पेपर दिला नव्हता. दि २१ रोजी सायंकाळी रुममध्ये अभ्यास करत असतांना तो करवंद नाका येथून रिक्षा स्टॉप जवळ गेला व तेथून बेपत्ता झाला. त्याचा सर्वत्र शोध सुरु असतांना राहुल कुठेही मिळुन आला नाही.  शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याचा शोध सुरु असतांना सावळदे गावाजवळील तापी नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला.

त्याच्या पश्चात आई वडील व भाऊ असा परिवार होत. त्याचे आत्महत्याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. 

टॅग्स :DhuleधुळेStudentविद्यार्थीTapi riverतापी नदी