शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
3
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
4
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
5
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
6
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
7
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
8
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
9
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
10
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
11
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
12
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
13
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
14
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
15
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
16
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
17
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
18
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
19
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
20
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर

आमदारांच्या वाहनावर दगडफेक, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 11:52 AM

तणावाची होती स्थिती : आमदारांवर रुग्णालयात उपचार सुरु

ठळक मुद्दे आमदारांच्या वाहनावर दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखलआमदार अनिल गोटे यांची प्रकृति स्थिर

धुळे : आमदार अनिल गोटे यांच्या वाहनावर शनिवारी रात्री झालेल्या दगडफेक प्रकरणी वाहन चालक साजिद खान इजाज खान पठाण (रा़ मुस्लीम नगर, चाळीसगाव रोड, धुळे) यांनी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला़ आमदार अनिल गोटे यांच्या वाहनावर शनिवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास अज्ञात दोन जणांनी दुचाकीवरून येऊन दगडफेक केली़ या घटनेनंतर शिवतिर्थ परिसरात तणाव निर्माण झाला होता़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली़ शहराचे आमदार अनिल गोटे हे रात्री दहा वाजता कल्याण भवन येथील लोकसंग्रामच्या कार्यालयात बसले होते़ चालक साजिद खान हे गाडी (एमएच १८ एजे ३३६६) कार्यालयाबाहेर काढून रस्त्यावर लावत असतांनाच समोरून दोन जण दुचाकीवर आले व त्यांनी वाहनाच्या काचावर दगडफेक करून काही क्षणात पळ काढला़ त्यानंतर साजिद खान यांनी तातडीने कार्यकर्त्यांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी समर्थकांनी गर्दी केली़ यावेळी काही वेळातच पोलीस अधीक्षकांसह पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला होता़ या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता़ या घटनेनंतर समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती़ आमदारांवर रुग्णालयात उपचारघटनेनंतर आमदार अनिल गोटे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने मालेगाव रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ सध्या त्यांची प्रकृति स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असल्याचे त्यांचे पुत्र तेजस गोटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ 

टॅग्स :DhuleधुळेAnil Goteअनिल गोटे