पेट्रोलचा दर दररोज वाढत असतानाच दोडाईचात पेट्रोल चोरही वाढत आहेत. आज पेट्रोलचा दर १०३ रुपये होता. आर्थिक आवक नसतानाही कामानिमित्त घेतलेली मोटारसायकल अनेकांना परवडत नाही. अशातच दुचाकींमधून पेट्रोलची चोरी होत असल्याने, दुचाकीस्वार त्रस्त झालेले आहे. कॉलनी परिसरात बंद दरवाजांची संधी शोधत पेट्रोलची चोरी केली जाते. घराच्या कंपाऊंडमध्ये मोटारसायकल असली तरी घरासमोरील कंपाऊंडवरून उडी मारून मोटारसायकलमधून पेट्रोल चोरी होते. घरासमोर मोटारसायकल असली तरी सराईत चोर पेट्रोल चोरी करीत आहेत. पेट्रोल चोरीसाठी कॉलनी परिसरात ठेवलेल्या बाकावर रात्री उशिरा पावेतो मोबाईल खेळत असल्याचे दाखवून टाइमपास केला जातो. रात्री ११-१२ वाजेपर्यंत बाकावर बसून घर बंद झाल्यावर ही पेट्रोल चोरी केली जाते. त्यामुळे वाहनधारक या चोरापासून त्रस्त झाले आहेत. गबाजी नगर, रोटरी परिसर या ठिकाणी पेट्रोल चोरी वाढली आहे.पोलिसांनी रात्री-अपरात्री बाकावर बसलेल्याचा बंदोबस्त करावा. रात्रीची गस्त वाढवावी,अशी मागणी आहे. त्यामुळे पेट्रोल चोरांचा अटकाव होईल, पोलिसांनी तत्काळ सक्रिय पेट्रोल चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.
दोंडाईचात पेट्रोल चोर सक्रिय, वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:25 IST