आॅनलाइन लोकमतधुळे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धुळ्यातील मालेगाव रोडवरील मैदानावर दुपारी सभा होणार असून, सभास्थळी पोहचण्यासाठी नागरिकांनी दुपारी १२ वाजेपासूनच गर्दी करण्यास सुरूवात केली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुपारी सभा होणार आहे. यासाठी जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्येने सभास्थळी दाखल होऊ लागले आहेत. सभास्थळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री एकनाथराव खडसे दाखल झालेले आहेत. दरम्यान सभास्थळी जाण्यासाठी नागरिकांची रांग लागलेली आहे.सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी टँकर, पाण्याचे जार याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच पार्किंगचीही वेगवेगळ्याठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी नागरिकांची गर्दी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 14:43 IST
पार्किंगसह पिण्याच्या पाण्याची केली आहे व्यवस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी नागरिकांची गर्दी सुरू
ठळक मुद्देनागरिकांनी दुपारी १२ वाजेपासूनच गर्दी करण्यास सुरूवात केली पार्किंगचीही वेगवेगळ्याठिकाणी व्यवस्था