शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

प्रलंबित मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांचा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 16:04 IST

महिलांची लक्षणीय उपस्थिती, विविध घोषणांनी शहर दणाणले उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना मागण्यांचे निवेदन दिले,

ठळक मुद्देमोर्चात जिल्ह्यातील जवळपास दीड हजार शिक्षकांचा सहभागविविध घोषणांनी परिसर दणाणलाशिक्षिकेची लक्षणीय उपस्थिती

आॅनलाईन लोकमत धुळे :  नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करा, वेतनश्रेणीबाबत काढण्यात आलेला अध्यादेश रद्द करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात जिल्ह्यातील जवळपास दीड हजार शिक्षक सहभागी होऊन त्यांनी शासनाविरूद्ध एकजूट दाखवून दिली. तब्बल दोन तास हा मोर्चा सुरू होता.राज्यातील प्राथमिक शिक्षक, शिक्षण व विद्यार्थी यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या संदर्भात संघटनांनी शासनाशी अनेकवेळा पत्रव्यवहार करून, तसेच समक्ष चर्चा करूनही त्यावर कोणताच निर्णय झालेला नाही. यापूर्वीही संघटनांमार्फत अनेकवेळा धरणे आंदोलने, मोर्चे व इतर आंदोलने करूनही योग्य ती कार्यवाही न झाल्याने, आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी आज मोर्चाचे नियोजन केले होते. यात जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटना सहभागी झालेल्या होत्या.दुपारी १२.२० वाजता कामगार भवन येथून मोर्चाला सुरवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी बॅनर धरलेले शिक्षक होते. त्यापाठोपाठ शिक्षिका होत्या.दोन रांगेत हा मोर्चा शिस्तित निघाला.मोर्चा शिवतिर्थ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जेल रोड, कमलाबाई चौक मार्गे दुपारी १.५० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.मोर्चा पोहचण्यापूर्वी पाच मिनीटे अगोदरच पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद केले होते. त्यामुळे मोर्चा प्रवेशद्वाराजवळ अडविण्यात आला.उपजिल्हाधिकाºयांनी स्वीकारले निवेदनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात येणारे निवेदन  भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी स्वीकारले. शिक्षकांनी आपल्या मागण्या त्यांच्यासमोर कथन केल्या. आपले निवेदन शासनापर्यंत पोहचविण्यात येईल असे आश्वासन उपजिल्हाधिकारी भारदे यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, पदवीधर रवींद्र उत्तम खैरनार,  गमन साहेबराव पाटील,देवीदास दौलत महाले, राजेंद्र गंगाधर जाधव, प्रमोद लक्ष्मण पाटील,  अकील अन्सारी, मिलिंद सुभाष वसावे,  उमराव साहेबराव बोरसे शिवानंद बैसाणे,  मनोहर यादवराव सोनवणे, शरद माधवराव सूर्यवंशी,भगवंत नामदेव बोरसे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.