शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात बसवर दगडफेक, नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 18:09 IST

पारोळा रोडवरील घटना : तिघांविरुध्द गुन्हा

ठळक मुद्देधुळ्यात महामंडळाच्या बसवर दगडफेकआझादनगर पोलिसात तिघांविरुध्द गुन्हा प्रवाश्यांमध्ये होते भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महामंडळाच्या बसवर दगडफेक झाल्याने प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले़ ही घटना पारोळा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीनजिक रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली़ या प्रकरणी सोमवारी पहाटे अडीच वाजता तिन अज्ञात विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़ यावल येथून निघालेली एमएच ४० एन ९०२४ क्रमांकाची राज्य परिवहन महामंडळाची बस धुळ्यात दाखल झाली़ पारोळा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नजिक असलेल्या राम पॅलेस समोर ही बस आल्यानंतर तीन जणांनी ही बस अडविली़ दमदाटी करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला़ अचानक झालेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते़ हे तिघे एवढ्यावरच न थांबता त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली़ ही घटना रविवारी रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास घडली़ या दगडफेकीत बसच्या पुढच्या भागाचे काच फुटल्याने महामंडळाचे १० हजाराचे नुकसान झाले आहे़ या घटनेनंतर अंधाराचा फायदा घेत दगडफेक करणारे तिघे घटनास्थळावरुन पळून गेले़ घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ परिसरात शोध घेतला असता दगडफेक करणारे तिघे सापडले नाही़ याप्रकरणी बस चालक मच्छिंद्र पुंजू पाटील यांनी आझादनगर पोलीस स्टेशनला सोमवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उगले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस