शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

वेतनप्रश्नी धरणे, घरकूलप्रश्नी बि:हाड!

By admin | Updated: February 14, 2017 23:56 IST

मनपा : दुस:या दिवशी आंदोलनांवर पडदा, जुने धुळे घरकूल योजनेचा आज श्रीगणे

धुळे : महापालिका कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाच्या दुस:या दिवशीही कर्मचा:यांनी दिवसभर मनपा आवारात बसून धरणे दिले, तर दुसरीकडे जुने धुळे परिसरात प्रस्तावित घरकुल योजनेचे काम सुरू करावे यासाठी सुरू असलेल्या बि:हाड आंदोलनाने दुस:या दिवशीही सर्वाचे लक्ष वेधल़े सायंकाळी आयुक्तांनी कर्मचारी संघटना व बि:हाड आंदोलनकत्र्याशी चर्चा केल्यानंतर दोन्ही आंदोलने मागे घेण्यात आली़मनपाचे कामकाज ठप्पमहापालिकेच्या कर्मचा:यांनी सोमवारपासून सुरू केलेले काम बंद आंदोलन दुस:या दिवशीही दिवसभर सुरू होत़े सर्व विभागाचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे सर्व विभागांच्या कार्यालयांना कुलूप लावण्यात आले होत़े कर्मचारी दिवसभर मनपा आवारात बसून होत़े नोटाबंदीमुळे मनपाला 15 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यातून मनपा कर्मचा:यांना पाचवा, सहावा वेतन आयोग व वैद्यकीय भत्ता देण्यासाठी साडेचार कोटी रुपये देण्याचे प्रशासनाने मान्य केले आह़े त्याप्रमाणे कर्मचा:यांना फरकाची रक्कम मिळण्यास सुरुवात झाली असून बाराशे रुपये वैद्यकीय भत्ता देण्याचे लेखी आश्वासनही देण्यात आले आह़े मात्र प्रशासनाने शब्द फिरवित 1 हजार रुपये वैद्यकीय भत्ता देण्याचे आदेश केले, तसेच रोजंदारी दरवाढ देण्याची मागणी प्रलंबित असल्याने मनपा कर्मचारी समन्वय समितीने काम बंद आंदोलन पुकारले होत़े दरम्यान, सदर आंदोलनात सहभागी कर्मचा:यांचे आंदोलनाच्या दिवसांचे वेतन कपात करण्याचे आदेश आयुक्तांनी आधीच दिले होत़े त्यानुसार प्रशासनाने कर्मचारी संघटनेला नोटीस देण्याचा प्रयत्न केला असता संघटनेने प्रशासनाची नोटीस स्वीकारलेली नाही़मनपा आवारात ‘बि:हाड’शहरातील जुने धुळे परिसरातील सुपडू अप्पा कॉलनीजवळ असलेल्या गट क्रमांक 36 मध्ये मनपाने एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत घरकूल योजना प्रस्तावित करण्यात आली आह़े मात्र सदर योजनेच्या लाभार्थीमध्ये दोन गट पडले आहेत़ एका गटाचा घरकूल योजनेस विरोध असून दुस:या गटाकडून योजनेचे काम सुरू करण्याची मागणी होत आह़े  महापालिकेचे अतिक्रमण निमरूलन पथक सोमवारी प्रस्तावित जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता वाद उद्भवला होता़ त्यानंतर योजनेच्या लाभार्थीपैकी एका गटाने मनपात धरणे देऊन महापौर, आयुक्त यांची भेट घेतली होती़ त्यानुसार चर्चेअंती संबंधित लाभार्थीना दोन दिवसांची मुदत देण्यात आली़ त्यानंतर दुपारून दुसरा गटही मनपात दाखल झाला होता व अतिक्रमण निघेर्पयत मनपात बि:हाड आंदोलन केले जाईल अशी भूमिका घेतली होती़ त्यानुसार सोमवारपासून मनपात सुरू असलेले बि:हाड आंदोलन मंगळवारी दुस:या दिवशीही सुरू होत़े दुपारी आंदोलनकत्र्यानी मनपा आवारातच भाकरी व भाजीचा स्वयंपाक करून जेवण केल़े मात्र सायंकाळी आयुक्तांनी बुधवारी कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर मनपा आवारातच खिचडीचा आस्वाद घेऊन सायंकाळी बि:हाड आंदोलनकर्ते घरी परतल़े अखेर काम बंद मागेमहापालिकेत सुरू असलेल्या दुहेरी आंदोलनांमुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली़ आयुक्त संगीता धायगुडे यांनी सकाळी 11 वाजता निवासस्थानीच अधिका:यांची बैठक घेऊन दोन्ही आंदोलनांबाबत माहिती घेतली़ कर्मचारी संघटनेच्या काही मागण्यांसंदर्भात दिवसभर नियमांची तपासणी सुरू होती़ सायंकाळी अधिकारी-पदाधिका:यांच्या उपस्थितीत कर्मचारी संघटनेच्या पदाधिका:यांना चर्चेसाठी बोलविण्यात आले होत़े चर्चेत सकारात्मक निर्णय झाल्याने काम बंद मागे घेतल्याचे संघटनेच्या पदाधिका:यांनी जाहीर केल़े त्यानुसार बुधवारपासून मनपाचे कामकाज सुरळीत सुरू होणार आह़ेआज अतिक्रमण हटविणाऱ़़जुने धुळे परिसरात प्रस्तावित घरकूल योजनेच्या प्रस्तावित जागेवरील अतिक्रमण काढून योजनेचे काम सुरू करावे, या मागणीसाठी मनपात सुरू असलेल्या बि:हाड आंदोलनाची दखल घेत मनपा प्रशासनाने बुधवारी अतिक्रमण हटवून योजनेचा श्रीगणेशा करण्याचा निर्णय घेतला आह़े त्या पाश्र्वभूमीवर मनपातर्फे पोलीस बंदोबस्त घेण्यात आला असून अतिक्रमित झोपडपट्टीमधील काही नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत़ आयुक्त, पोलीस अधीक्षक उपस्थित राहणाऱ़़बुधवारी सकाळी महापालिका आयुक्त व पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत जुने धुळे परिसरातील अतिक्रमित झोपडय़ा हटविल्या जाणार असून त्यानंतर लागलीच योजनेचे काम सुरू केले जाईल़ सदर योजनेंतर्गत एकूण 360 घरकुले प्रस्तावित असून त्यापैकी 260 घरकुलांचे काम जवळपास पूर्णत्वास आले असले तरी त्यापैकी बहुतांश घरकुले रिकामीच आहेत़ तर उर्वरित 120 घरांचे बांधकाम सुरू केले जाणार आह़े कर्मचारी संघटनेचे ‘काम बंद’ सायंकाळी माग़े़़कर्मचारी संघटनेच्या पदाधिका:यांसह आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर संघटनेच्या मागण्यांबाबत झालेले निर्णय-पाचव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी 30 हजारांच्या मागणीपैकी आता 20 हजार व उर्वरित 10 हजार रुपयांसाठी शासनाकडून मार्गदर्शन मागविणाऱवैद्यकीय भत्ता डिसेंबरपासून प्रत्येकी 1 हजार व एप्रिलपासून त्यात 200 रुपये वाढ़रोजंदारी दरवाढ व फरक याप्रश्नी सरकारी कामगार अधिका:यांकडून मार्गदर्शन मागविल्यानंतर निर्णय घेणाऱया निर्णयांनंतर संघटनेच्या पदाधिका:यांनी काम बंद आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली़