कापडणे परिसरात रुग्ण शोधमोहीम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:38 AM2021-05-06T04:38:24+5:302021-05-06T04:38:24+5:30

कापडणे गावात सध्या कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. कापडणे ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत ...

Patient search operation begins in the area of the cloth | कापडणे परिसरात रुग्ण शोधमोहीम सुरू

कापडणे परिसरात रुग्ण शोधमोहीम सुरू

Next

कापडणे गावात सध्या कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. कापडणे ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. २८ एप्रिलपासून कापडण्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावात रुग्ण सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला. या सर्वेक्षणातून संपूर्ण गावातील रुग्ण संख्या व संशयित रुग्णांचा एकूण आकडा समोर येणार आहे. या कामासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व अंगणवाडी सेविका व कर्मचारी एप्रिल हिटच्या रणरणत्या संपूर्ण दिवसभर उन्हातही सर्वेक्षणाचे काम करीत आहेत.

सरपंच सोनीबाई भील, उपसरपंच प्राध्यापिका अंकिता पाटील, ग्राम विकास अधिकारी प्रवीण ठाकरे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षिकांना व अंगणवाडी सेविकांना आपापल्या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे .

या सर्वेक्षण मोहिमेत शिक्षिका हर्षदा बोरसे, रूपाली पाटील, ज्योती सोनार, विजय पाटील, वैशाली बोरसे, शारदा शिंदे, किरण पाटील, विजया पेंढारकर, कल्पना वैद्य, कल्पना भांमरे, दीपा पिंगळे, ज्योत्स्ना पाटील, भाग्यश्री भामरे, सुमन वनी, रत्ना अहिरे, योगेश पाटील, कमल पाटील यांच्यासोबत अंगणवाडी सेविका राजश्री पाटील, अर्चना सोनार, वंदना भांमरे, वंदना पाटील, सरला माळी, सुरेखा पाटील, भारती पाटील, संगीता पाटील, शर्मिला पाटील, आशा माळी, सरला विसावे, रत्ना पाटील, प्रमिला पाटील, जनाबाई पाटील, सूर्यमाला पाटील, उषा पाटील, ललिता पाटील, ललिता भिल, संगीता पाटील, कर्मचारी काम करीत आहेत.

सर्वेक्षण दरम्यान शिक्षक व अंगणवाडी सेविका, ग्रामस्थांचे समुपदेशनही करीत आहेत.

Web Title: Patient search operation begins in the area of the cloth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.