लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील ग्रामीण तहसिल कार्यालयात पार्किंगची समस्या सुरूवातीपासूनच कायम आहे़ गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून लॉकडाउनमुळे शासकीय कामकाज बंद असल्याने गर्दी नसल्याचा फायदा घेत उपाययोजना करणे शक्य होते़ परंतु तसे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत़लॉकडाउनमध्ये शिथीलता दिली असली तरी अजुनही अत्यावश्यक कामकाज वगळता विविध दाखले आणि कागदपत्रांची पुर्तता करण्याचे काम बंद आहे़ त्यामुळे तहसिल कार्यालयात गर्दी नाही़ पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता प्रशासनाला संधी आहे़शहरात जुन्या मामलेदार कार्यालयाच्या जुनी इमारतीच्या जागेवर शासनाच्या निधीतून तहसिलदार कार्यालयाची नवीन इमारत उभारली गेली. मात्र परिसरात मोकळी जागा असतांना तालुका पोलिस ठाण्याच्या शेजारी अतिशय अडचणीच्या जागेत ही इमारत उभारली गेली. इमारतीच्या पुढील दर्शनीभागात चार ते पाच फुटाची बोळ सोडून तेथे अधिकारी, कर्मचारी व कार्यालयात येणा?्या नागरीकांच्या वाहनाची पार्किंगची सोय करण्यात आली. मात्र तहसिलदार कार्यालयाचा व्यप लक्षात घेता ही जागा कर्मचाऱ्यांच्या वाहनासाठीही पुरत नाहीत. त्यामुळे कामानिमित्त येणारे नागरीक परिसरात मिळेल त्याठिकाणी बेशिस्तपणे आपली वाहने पाकिग करीत असतात. वाहन पार्किंगसाठी कोणत्याही प्रकारची स्वतंत्र सोय नसल्याने नागरीकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. जुन्या मामलेदार कार्यालयात तलाठी कार्यालय, रेकार्ड रूम, तलाठी पतसंस्थेचे कामकाज चालते. त्याठिकाणीही अनेक जण दिवसभर येतात. त्यांच्याकडूनही तेथेच वाहने बेशिस्तपणे पार्किंग केली जातात. त्यामुळे परिसरातून तहसिलदार कार्यालयात नागरीकांना बेशिस्त लावलेली वाहने तुडवित आतमध्ये जावे लागते. येथे पार्किंगची सुविधा करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे़तहसिलदार कार्यालयाच्या आवारातील बेशिस्त वाहन पार्किंगसह कार्यालयाच्या संरक्षण भिंतीलगतच काही चहा विक्रेते, गॅरेज व इतर खाद्यपदार्थ विक्रेते अतिक्रमण करुन स्टॉल लावतात़ याशिवाय झेरॉक्स व इतर शासकीय योजनांचे अर्ज विक्री करणारे काही फिरती दुकानेही लावली जातात. तर काही चारचाकी वाहनेही याठिकाणी कायमस्वरूपी उभी असतात. याशिवाय कार्यालयात वाहनपार्किंगची सोय नसल्याने अनेक नागरीक कार्यालयासमोरील दुकानासमोर व इतर रस्त्यावर लावतात. त्यामुळे अगोदरच अरूंद असलेला रस्ता अधिक अरूंद होवून त्याचा वाहतूकीला अडथळा निर्माण होतो.या रस्त्यावर दिवसातून अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होवून डोकेदुखी ठरते़ तहसिल कार्याजवळ झालेली वाहतूक कोंडींची समस्या नित्याची बाब बनली आहे़ वाहनचालकांसह वाहतूक शाखेच्या पोलिसांनाही नाकेनऊ येते़ त्यामुळे उपाययोजना करण्याची गरज आहे़़़़ तर ही समस्या निर्माण झाली नसती४तहसिल कार्यालयाची इमारत एक मजली करण्यात आली़ तसेच चारही बाजूला कार्यालय व मध्यभागी मोकळी जागा सोडल्यामुळे बाजूला जागा शिल्लक राहिली नाही़ त्याऐवजी वाडीभोकर रोडवर ज्याप्रमाणे पंचायत समितीची इमारतीचे बांधकाम केले गेले, त्याप्रमाणे इमारत उभारुन तळमजल्यावर वाहन पार्किंग केली असती तर आज हा प्रश्न निर्माण झाला नसता़ मात्र इमारतीच्या नियोजनात फेरबदल केले गेल्याचे संबंधितांकडून सांगितले जाते़
तहसिल कार्यालयात पार्किंगची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:55 IST