धुळे : शहरासह परिसरात पावसाची संततधार सुरु आहे़ साक्री तालुक्यातील पश्चिम पट्यात समाधानकारक पाऊस झाल्याने मालनगाव, जामखेडी धरण ओसंडून वाहत आहेत़ परिणामी पांझरेत पाणी आल्याने अक्कलपाड्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने पांझरेला पूर आलेला आहे़ धुळे शहरातील कालिका माता मंदिराजवळील पुल पाण्याखाली गेला आहे़ परिणामी हा पूल वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे़ सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे़ सुरक्षितता म्हणून ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला असून अग्नीशमन बंब देखील नदीकाठी सज्ज ठेवण्यात आलेला आहे़
संततधार पावसामुळे पांझरेला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 14:02 IST