शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पंचायतराज लोकशाहीचा आत्मा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 23:03 IST

धुळे जिल्हा कॉँग्रेसतर्फे आयोजित चर्चासत्र, सत्कार कार्यक्रमात हनुमंत पवार यांचे प्रतिपादन 

ठळक मुद्देपंचायतराज दिनानिमित्त जिल्हा कॉँग्रेसतर्फे आयोजनजिल्हाभरातून पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींचा गौरव 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भारतीय राज्यघटनेच्या ७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा दिला. राजीव गांधी यांनी १९८९ ला मांडलेले ६४ वे घटनादुरुस्ती विधेयक तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव सरकारने १९९२ ला संसदेत मांडून सत्ता विकेंद्रीकरण करण्याचे राजीवजींचे स्वप्न साकार केले. समाजातील दलित, आदिवासी व महिलांना लोकशाहीच्या केंद्रस्थानी आणून लोकांचा सहभाग असलेली लोकशाही देशात स्थापित केली. त्याचे संपूर्ण श्रेय कॉँग्रेस पक्षाच्या सर्वसमावेशक विचारांना जाते, असे प्रतिपादन युवक कॉँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केले. २४ एप्रिल या पंचायतराज दिनानिमित्त कॉँग्रेस कमेटीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख, जिल्हा प्रभारी अ‍ॅड.ललिता पाटील, आमदार कुणाल पाटील, आमदार डी.एस. अहिरे, आमदार काशिराम पावरा, जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते, रमेश श्रीखंडे, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, महानगराध्यक्ष युवराज करनकाळ, विमल बेडसे, राजेंद्र देसले, हर्षवर्धन दहिते, भगवान गर्दे, डॉ.दरबारसिंग गिरासे, विजय गजानन पाटील, किरण अहिरराव, हर्षल साळुंखे, राजेश पाटील, रावसाहेब पवार, दिलीप काकुस्ते, हिरामण बैसाणे आदी उपस्थित होते. सुरुवातीपासून रा.स्व. संघ व भाजपा सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या विरोधात आहेत. मतदानाची सक्ती, लोकप्रतिनिधींसाठी शिक्षणाची अट, पं.स. व जि.प. सदस्यांच्या अधिकारात कपात, प्रशासकीय अधिकाºयांना सर्वाधिकार, नियोजन व विकासकामे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून काढून घेण्यातून आताचे फडणवीस सरकार लोकशाहीचा आत्मा मारून टाकत आहे. याविरोधात कॉँग्रेस कार्यकर्ते उभे  राहतील, असा विश्वास वक्ते पवार यांनी व्यक्त केला. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, पी.बी. पाटील, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, पतंगराव कदम, अमरिशभाई पटेल, रोहिदास पाटील, डॉ.हेमंत देशमुख यांच्यासारखे नेते स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सनेर यांनी केले. आजी-माजी लोकप्रतिनिधींचा गौरव आरंभी स्व. राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. पंचायतराज प्रणालीतून नेतृत्व करणाºया जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील आजी-माजी लोकप्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सर्वप्रथम जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, नलिनी गायकवाड, दत्तू पाडवी, प्रल्हादराव पाटील, विलास बिरारीस, मधुकर बागुल, उत्तमराव देसले, गणपत भोये, पुरुषोत्तम पाटील, लीलाधर पाटील, सुवर्णा प्रकाश पाटील, किशोर रंगराव पाटील, गायत्री जयस्वाल, पीतांबर महाले, युवराज करनकाळ, प्रकाश पाटील, गुलाब सोनवणे, रामभाऊ माणिक, डॉ.रवींद्र देशमुख, जितेंद्र गिरासे, नंदू सोनवणे, प्रभाकर बच्छाव, निर्मलाबाई बच्छाव, छोटू चौधरी, आबा मुंडे, बापू महाजन, महेंद्र पाटील, राजेंद्र देवरे, हेमराज पाटील यांचा प्रातिनिधिक स्वरुपात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :Dhuleधुळेcongressकाँग्रेस