नेर : येथे रविवारी मुस्लिम समाजातर्फे रॅली काढून शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, वीर जवान तुझे सलाम, अमर रहे अमर रहे, भारत माता की जय, वंदेमातरमच्या घोषणांनी परिसर दणाणला होता.रॅलीत मुस्लिम ट्रस्टचे अध्यक्ष जाकीर तांबोळी, लतीफ तांबोळी, शौकत जहागीरदार, शरिफ मौलाना, बद्रोद्दीन खाटीक, शेख युनुस, फरिदखॉ पठाण, अबजल बेग, शेख रुबाब, शेख मोईद्दीन जुबेर तांबोळी, सरदार तांबोळी, ईब्राईम शहा, असलम तांबोळी, सरपंच शंकरराव खलाणे, शिवसेनेचे तालुका प्रमुख मनीष जोशी, वि.का. सोसायटी चेअरमन साहेबराव सोनवणे, गुलाब बोरसे, वसंत देशमुख, ग्रा.पं. सदस्य धर्मा माळी, नामदेव माळी, सुरेश सोनवणे, दिनेश सोनवणे, संजय चौधरी, पोलीस पाटील विजय देशमुख, योगेश गवळे, राकेश परदेशी, गोटु अमृतसागर, राकेश अहिरे, दिनेश अहिरे, सुनिल भागवत, वसंत देशमुख यांच्यासह मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पाकिस्तान मुर्दाबादचा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:36 IST