शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आमची लढाई गोटेंशी नाहीच, त्यांची उगाच आदळआपट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 21:57 IST

सुभाष भामरे : गुंड कोण हे आता जनतेनेच ठरवावे

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आम्ही लोकसंग्राम पक्षाला गृहीत धरत नाही़ त्यामुळे आमची लढाई काँग्रेस-राष्ट्रवादीशी असून आमदार उगाच आदळआपट करीत असल्याची टीका केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी केली़ शहरात शुक्रवारी लोकसंग्रामच्या गुंडांनी जो धुमाकूळ घातला तो जनतेने पाहिला़ पारोळयाचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्या गाडीचा क्रमांक एमएच १९ होता म्हणून फोडण्यात आली़ शिवाय त्यांना साधी तक्रारही देता आली नाही, हे दुर्देव आहे़ काही कारण नसतांना गाडी फोडल्याने आमदारांनी कार्यकर्त्यांना सुनावायला हवे होते तर त्यांनी पोलीस ठाण्यात धुडगूस घातला़ अखेर पोलीसांना माघार घ्यावी लागली, ही लोकशाही की दडपशाही? असे डॉ़ भामरे म्हणाले़ त्याचप्रमाणे भाजप प्रांतिक कार्यालयातून १७ जणांची टिम धुळयात जनजागृतीसाठी आली होती, त्यांनाही लोकसंग्रामचे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोंडून देत हुज्जत घातली़ प्रभाग एकमध्ये भाजप कार्यकर्ते रात्री घरी जात असतांना लोकसंग्रामच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली़ गुंडगिरी करून जनतेत दहशत निर्माण करण्याचे काम लोकसंग्रामकडून सुरू असून शहरात गुंडगिरी चालू देणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी आधीच दिला आहे, असे डॉ़ भामरे म्हणाले़ शहरातील गुंडगिरी थोपविण्यासाठी गृहखाते सक्षम आहे़ भाजपकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याच्या आरोपात तथ्य नाही़ मतदानानंतर हा मुद्दा गांभीर्याने घेणार आहोत़  भाजप प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतो, म्हणून आमचे नेते प्रचाराला येतात़ तुमच्याकडे नेतेच नाही, तर तुम्ही आणणार कुठून? असा प्रश्न संरक्षण राज्यमंत्री डॉ़ भामरे यांनी उपस्थित केला़ शिवाय शहरात गुंड कोण, हे आता जनतेनेच ठरवावे, असेही ते म्हणाले़ 

टॅग्स :Dhuleधुळे