पी. एम. सोनवणे (कृषी विकास अधिकारी, जि. प., धुळे) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सी. डी. देवकर (सहयोगी अधिष्ठाता कृ. म. वि. धुळे) हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर धीरज कंखरे, डॉक्टर श्रीधर देसले, डॉक्टर एच. डी. पाटील, डॉक्टर पंकज पाटील, विनय बोरसे, जयेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉक्टर सी. डी. देवकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी फक्त शेतीवर अवलंबून न राहता शेतीला पूरक असा जोडधंदा करून स्वावलंबी व्हावे, असे आवाहन त्यांनी मार्गदर्शनपर भाषणात केले. त्यात दुग्ध व्यवसाय, भाजीपाला व्यवस्थापन, फळबाग व्यवस्थापन, कापूस कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रिय शेती व्यवस्थापन आदी विविध विषयांवर उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना शेती दिनानिमित्ताने मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतन देवरे यांनी केले. के. पी. देवरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी के. पी. देवरे, पुरुषोत्तम देवरे, उपसरपंच संजय महाराज कृषिदूत यांनी विशेष प्रयत्न केले.
220821\img-20210821-wa0034.jpg~220821\img-20210821-wa0036.jpg
वडजाई येथे कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन~वडजाई येथे कृषी दीन साजरा