नेर गटातील विरोधक निवडणुकीसाठी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:33 AM2021-03-06T04:33:53+5:302021-03-06T04:33:53+5:30

नेर जिल्हा परिषद गटातून मनीषा खलाने या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. त्यात आधीच कोरोनामुळे पूर्ण वर्षभर ठरावीक विकास ...

Opposition groups called for a by-election | नेर गटातील विरोधक निवडणुकीसाठी सरसावले

नेर गटातील विरोधक निवडणुकीसाठी सरसावले

Next

नेर जिल्हा परिषद गटातून मनीषा खलाने या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. त्यात आधीच कोरोनामुळे पूर्ण वर्षभर ठरावीक विकास कामे वगळता बाकी काम झाले नाही. त्यास अजूनही ब्रेक लागला आहे. पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. म्हणून विकास कामांना खीळ बसली आहे. परिणामी त्यात पुन्हा आता सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद गटात ओबीसी गटातून निवडून आलेल्या उमेदवारांचे सदस्यत्व रद्द करून दोन आठवड्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहे. त्यात भाजपचे तब्बल १५ सदस्यांवर गंडांतर येणार आहे. त्यात नेर गटातून निवडून आलेल्या मनीषा खलाने यांचा ही समावेश आहे. न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिल्याने नेर गटातील भाजपचे विरोधक आणि इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू करून दिली आहे. तर वरिष्ठ काय निर्णय घेतात आणि आदेश देतात यावर मनीषा खलाने यांची भूमिका ठरणार आहे. एकंदरीत निवडून आल्यानंतर कमी कालावधीत कोणतीही ठोस विकास कामे झाली नसल्याने भाजपाला निवडणूक लढतांना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यात नुकतीच नेर ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आहे. त्यात मनीषा खलाने यांचे पती शंकरराव खलाने यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. त्यामुळे किमान पुन्हा जिल्हा परिषदेचा गट राखण्यासाठी त्यांना शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

Web Title: Opposition groups called for a by-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.