स्त्रीभ्रूण हत्या डॉक्टरच थांबवू शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 12:40 PM2020-03-18T12:40:55+5:302020-03-18T12:41:17+5:30

डॉ.तुषार रंधे : आयुर्वेद महाविद्यालयात गुणगौरव सोहळा

Only doctors can stop female feticide | स्त्रीभ्रूण हत्या डॉक्टरच थांबवू शकतात

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : समाजात स्रीभृण हत्या मोठ्या प्रमाणात होते, यास डॉक्टरच आळा घालु शकतात. सामाजिक जबाबदारी समजून याची जनजागृती करायला हवी. भविष्यात ज्या क्षेत्रात काम कराल ते प्रामाणिकपणे करा असे प्रतिपादन जि़प़ अध्यक्ष डॉ़तुषार रंधे यांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना केले़
बोराडी येथील कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर आयुर्वेद महाविद्यालयात क्षितीज २०२० हा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम झाला. वर्षभरात विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला़
यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल, किसान विद्या प्रसारक संस्थेच्या विश्वस्त लीला रंधे, माजी जि.प.सदस्या सिमा रंधे, रोहीत रंधे, शामकांत पाटील, शशांक रंधे, प्राचार्य बी.डी.पाटील, जी.ओ. पाटील, सुचित्रा वैद्य, प्राचार्य डॉ.आर. एम.गिरी, डॉ.पी.के. साळुंखे, डॉ.दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल म्हणाले, स्नेहसंमेलन हा महाविद्यालयीन जीवनाचा अविस्मरणीय प्रसंग असतो. यात मिळालेले बक्षिस आयुष्यभराचा अमुल्य ठेवा असतो. भविष्यात पुढे जाताना यशाला शॉर्टकट नसतो. त्यासाठी मेहनत घ्यायलाच हवी. कोणत्याही क्षेत्रात जा पण मनापासून काम करा. भविष्यात ग्रामीण, दुर्गम भागात वैद्यकीय सेवा करण्याचे आवाहन केले.
यानिमित्ताने क्रीडा स्पर्धा, शाळेत जाऊ या, फन फेअर तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन संस्थेचे सचिव निशांत रंधे, सारीका रंधे यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ.जया जाणे, दिवेश पाटील, अंजली पाटील, डॉ.आर.आर.कामडे, डॉ.एस.बी.मिरे, डॉ.जी.व्ही.सोनवणे, डॉ.एस.के. बिरारी, डॉ.संजय बत्रा, डॉ.विशाल पाटील यांनी परीश्रम घेतले.

Web Title: Only doctors can stop female feticide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे