शासनाने १८ वर्षांवरील नागरिकांना १ मे पासून लस देण्याची घोषणा केली होती़. परंतु लसीचा तुटवडा असल्याने प्रत्यक्षात लसीकरण सुरू होणार की नाही, याविषयी साशंकता व्यक्त केली जात होती़. लसीकरण पुढे ढकलण्यात येणार असल्याचेही बोलले जात होते़, परंतु शेवटच्या क्षणी धुळे जिल्ह्यात ५ केंद्रांवर पहिल्याचदिवशी १८ वर्षावरील नागरिकांना लस टोचण्याचे नियोजन करण्यात आले़. पहिल्याचदिवशी शिरपूर व साक्री येथील केंद्रांवर लसीचा पुरवठा न झाल्यामुळे ही केंद्रे सुरू करण्यात आली नाहीत़, मात्र नागरिकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात गर्दी करून गोंधळ घातला़.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़. धु्रवराज वाघ यांच्याकडे अनेकांनी धाव घेतली़. त्यावेळी त्यांनी या रुग्णालयात १८ वर्षांवरील लोकांऐवजी ४५ वर्षांवरील लोकांना लस दिली जाईल़, १८ वर्षांवरील लोकांसाठी शहरातील वाल्मिकनगरातील उपकेंद्रात सुविधा करण्यात आल्याचे उपस्थितांना सांगण्यात आल्यामुळे त्या नागरिकांनी लगेच त्या उपकेंद्रात धाव घेतली़; मात्र ते उपकेंद्रात कुणीच उपस्थित नसल्यामुळे ते पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात आले़. बराच गोंधळ झाल्यानंतर नागरिक आपआपल्या घरी लस न घेता निघून गेले.
२ तारखेपासून वाल्मिकनगरऐवजी नपाच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलला १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे ठरविण्यात आले़; मात्र २ रोजी सकाळी ११ नंतर १५०० लस प्राप्त झाल्यानंतर अवघ्या काही वेळानंतर येथील हॉस्पिटलमध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांना लस देण्यात आली़; मात्र ज्यांनी २ तारखेची नोंदणी केली होती, असे कमी नागरिक आले; मात्र ज्यांनी नोंदणी केली नव्हती अशा नागरिकांनी हॉस्पिटलला गर्दी केली़. परंतू त्यांना नोंदणीअभावी लस न देण्यात आल्यामुळे त्यांच्यात गोंधळ उडाला़.
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लस घेण्यासाठी शासकीय निर्देशानुसार कोविन पोर्टलवर रितसर नोंदणी करणे अनिवार्य आहे़. केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांचेच लसीकरण केले जाणार आहे़. ही नोंदणी झाल्यानंतर पोर्टलवर दिनांक निवडून आपली अपॉईटमेंट आरक्षित करावयाची आहे़ आणि त्या वेळेला त्या केंद्रावर जाऊन लस घ्यावयाची आहे, असे नगरपालिकेने स्पष्ट केले आहे़
दरम्यान, तालुक्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर होत असलेले लसीकरणसुध्दा लसींचा तुटवडा असल्याने बंद आहे़. सोमवारीदेखील ग्रामीण भागात लसीकरण बंद होते़. कदाचित आज-उद्या लस आली तर लसीकरण पूर्ववत सुरू होईल़.
येथील उपजिल्हा रुग्णालयात १ मे पर्यंत ९ हजार १६० कोविशिल्ड लसीचा पुरवठा झाला होता, त्यापैकी ८ हजार ६९३ जणांना लस देण्यात आली आहे़. लसीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे रविवारी लसीकरण करता आले नाही़. पहिला डोस आरोग्य सेवक २६३४, फ्रंटलाईन वर्कर ५५६, ज्येष्ठ नागरिक २१५५, ४५ वर्षांवरील १७५८ असे एकूण ७ हजार १०३ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे़. दुसरा डोस आरोग्य सेवक ५१४, फ्रंटलाईन वर्कर ३६०, ज्येष्ठ नागरिक ३९४, ४५ वर्षांवरील ३२२ असे एकूण १ हजार ५९० म्हणजेच आतापर्यंत या रुग्णालयात एकूण ८ हजार ६९३ जणांना लस देण्यात आली आहे़