राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आणि त्यांची नात राजमाता पद्माराजे रघुजीराव कदमबांडे यांच्या स्मृतीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद, धुळे जिल्हा शाखा आणि नंदुरबार जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहासाचे अभ्यासक व संशोधक प्रा.डॉ. अनिल बैसाणे धुळे यांचे ‘लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व' या विषयावर ‘गुगल मीट’ ॲपवर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले, त्यावेळी डॉ. बैसाणे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित झेड.बी. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच. पवार यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धुळे- नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी प्रा.डॉ. शशिकला पवार यांनी केले. धुळे शाखेच्या अध्यक्षा प्रा. उषा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. उमेश शिंदे यांनी केले, तर आभार प्रा. प्रशांत बागूल यांनी मानले. कार्यक्रमाचे वृत्तसंकलन प्रा.डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या आयोजनात धुळे शाखेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. चुडामण पगारे, उपाध्यक्ष डॉ. संजीव गिरासे, कार्यवाह डॉ. सुरेंद्र मोरे, प्रा.डॉ. वाल्मीक आढावे, कोषाध्यक्ष प्रा.डॉ. सुनील पवार, नंदुरबार शाखेचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पाटील, कार्यवाह डॉ. गिरीश महाजन, कार्यवाह राम दाऊदखाने, संतोष पाटील, सुदीपभाऊ पाटील, कार्यकारिणीचे इतर पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले, तर कार्यक्रमास धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील रसिक श्रोते आणि सभासद यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.