धुळ्यात दरोडा टाकण्यापूर्वीच एकाला पकडले, चौघे फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 10:28 PM2020-12-25T22:28:46+5:302020-12-25T22:29:07+5:30

सुरत बायपासवरील घटना : गस्त घालत असताना घडला प्रकार

One was caught before the robbery in Dhule, four absconding | धुळ्यात दरोडा टाकण्यापूर्वीच एकाला पकडले, चौघे फरार

धुळ्यात दरोडा टाकण्यापूर्वीच एकाला पकडले, चौघे फरार

Next

धुळे : गुन्हेगारी रोखण्यासाठी शहर पोलीस राबवित असलेल्या कोम्बिग ऑपरेशनदरम्यान, सुरत बायपासवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या पाच जणांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले. अंधाराचा फायदा घेऊन चौघे फरार झाले असले तरी पोलीस त्यांच्या मागावर आहेत. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी शहर पोलीस सज्ज झाले असून, शोध मोहीम राबवित आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील, एस. पी. तिगोटे, कर्मचारी भिकाजी पाटील, संदीप पाटील हे सुरत बायपासवर गस्त घालत होते. चक्करबर्डी पाण्याच्या टाकीजवळ काही तरुण त्यांना संशयास्पदरित्या हालचाल करताना आढळून आले. त्याचवेळेस पोलिसांनी आपले वाहन त्यांच्या दिशेने नेले. त्याचवेळेस चार जणं दोन दुचाकीवरून जाण्यात यशस्वी ठरले. तर, विजय ईश्वर सोनवणे (२८, रा. आरती कॉलनी, नगावबारी चौफुली, देवपूर धुळे) हा पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याजवळ असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत मिरचीची पूड आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली. त्यांचा कुठेतरी दरोडा टाकण्याचा उद्देश असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

विजय सोनवणे याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने त्याच्या सोबत असलेल्यांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांकडून आता त्यांचा शोध सुरू झाला आहे.
याप्रकरणी पोलीस कर्चचारी संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून विजय सोनवणे याच्यासह पाच जणांविरुध्द भादंवि कलम ३९९, ३४ सह विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, फरार असलेल्या चौघांच्या घरावर पोलिसांची नजर आहे. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. तिगोटे करीत आहेत.

Web Title: One was caught before the robbery in Dhule, four absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे