अज्ञात वाहनाची धडक एकाचा मृत्यू, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 11:30 AM2020-11-21T11:30:29+5:302020-11-21T11:30:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : भरधाव वेगाने पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाल्याची ...

One killed, one injured in unidentified vehicle collision | अज्ञात वाहनाची धडक एकाचा मृत्यू, एक जखमी

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : भरधाव वेगाने पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाल्याची दुर्घटना मालेगाव रोडवर धुळ्यानजिक घडली. तर सोबत असलेला एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना १८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणाची नोंद मोहाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली.
मध्यप्रदेश राज्यातील रतलाम जिल्ह्यातील मलवासा तालुक्यातील नायन येथे राहणारे रोहित राध्येश्याम नायक आणि बबलू गोपाल बंजारा हे दोघे दुचाकीने धुळेमार्गे कोपरगाव येथे जात होते. धुळ्यानजिक मालेगाव रोडवरील हॉटेल सिटीपॉईंटजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. अपघाताची ही घटना १८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात रोहित नायक आणि बबलू बंजारा या दोघांना गंभीर दुखापत झाली. हाता-पायासह डोक्याला लागल्याने त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाच रोहित नायक याचा मृत्यू झाला. तर, बबलू बंजारा याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्राथमिक उपचार केल्यानंतर मोहाडी पोलीस ठाण्यात १९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास बबलू बंजारा यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरुध्द भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ यासह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दराडे करीत आहेत.

Web Title: One killed, one injured in unidentified vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.