शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत एक ठार, डंपर अंगावरून गेल्याने दुसऱ्याचा मृत्यू

By देवेंद्र पाठक | Updated: December 21, 2023 22:12 IST

दोन अपघात : असली गावासह बाभळे शिवारातील घटना

धुळे : शिरपूर तालुक्यातील असली गावासह शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्यावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बुधवारी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

असली गावाजवळील घटनाशिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथून असली गावाकडे नितीन रामेश्वर कोळी (वय २८, रा. असली ता. शिरपूर) हा तरुण पायी घरी जात होता. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. अपघाताची ही घटना शिरपूर ते चोपडा रोडवरील असली गावाच्या फाट्याजवळ घडली. यात फेकला गेल्याने नितीन कोळी याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर वाहनचालकाने वाहनासह पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत नितीन कोळी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला अधिक मार लागल्याने उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी युवराज शिवा कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून थाळनेर पोलिस ठाण्यात बुधवारी मध्यरात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

बाभळे शिवाराजवळची घटनाशिंदखेडा तालुक्यातील बाभळे शिवारातील जामफळ धरण परिसरातील मोकळ्या जागेत सखाराम बारकू पाटील (वय ६२, रा. लोहगाव, ता. शिरपूर हमु जामफळ धरण) हे झाेपलेले होते. अशातच एमएच १८ बीजी ९४०६ क्रमांकाचा डंपर भरधाव वेगाने आल्याने पाटील यांच्या अंगावरून वाहन चालून गेले. ही घटना जामपळ धरण शिवारात सोमवारी पहाटे ४ ते साडेचार वाजेच्या सुमारास घडली. यात गंभीर जखमी झाल्याने सखाराम पाटील यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी सुकलाल सकाराम पाटील (वय २६, रा. लोहगाव ता. शिरपूर, हमु तराड कसबे ता. शिरपूर) या मजुराने दिलेल्या फिर्यादीवरून डंपर चालकाविरोधात बुधवारी शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक गोरावडे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू