जिल्ह्यात लसीकरणाच्या पहिल्या दिवशी एक डोस गेला वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:12 PM2021-01-21T16:12:16+5:302021-01-21T16:12:30+5:30

धुळे : जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणाची सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी लसीकरणात जिल्ह्याने बाजी मारली होती. प्राप्त उदिष्ठांपैकी ९७.२५ टक्के ...

One dose wasted on the first day of vaccination in the district | जिल्ह्यात लसीकरणाच्या पहिल्या दिवशी एक डोस गेला वाया

जिल्ह्यात लसीकरणाच्या पहिल्या दिवशी एक डोस गेला वाया

Next

धुळे : जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणाची सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी लसीकरणात जिल्ह्याने बाजी मारली होती. प्राप्त उदिष्ठांपैकी ९७.२५ टक्के इतके लसीकरण करण्यात आले होते. जिल्ह्यासाठी ४०० जणांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यापैकी ३८९ जणांना लस टोचण्यात आली होती. तर ११ जण अनुपस्थित राहिले होते. राज्यात लसीकरणाच्या बाबतीत जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आला होता.
पहिल्या दिवशी ३८९ तर मंगळवारी ३१३ जणांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे. सर्वत्र लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र जिल्ह्यात डोस वाया जाण्याचे प्रमाण कमी राहिले आहे. साधारणतः १० टक्के डोस वाया जातात. मात्र जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ८ डोस वाया गेले आहेत.
मोहिमेसाठी जिल्ह्यात १० हजार १७० आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. या लसीचे १२ हजार ४३० डोस जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत. यामध्ये महानगरपालिकेला ५ हजार २५० डोस, उपजिल्हा रुग्णालय शिरपूरला ३ हजार २६० डोस व ग्रामीण रुग्णालय साक्रीला ३ हजार ९२० डोस पुरविण्यात आले आहेत. जनमानात कोरोना लसीचे भिती जावू यासाठी जिल्हा रुग्णालयात जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी प्रथम लस टोचून घेतली होती. मंगळवारी सुद्धा लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती.

Web Title: One dose wasted on the first day of vaccination in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.