कोरोनामुळे शिरपूर येथील महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 14:01 IST
जिल्ह्यातील ४३ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोनामुळे शिरपूर येथील महिलेचा मृत्यू
धुळे - जिल्ह्यातील आणखी एका कोरोनाबाधीत रूग्णाचा मृत्यू झाला आहे. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या शिरपूर येथील ५२ वर्षीय महिलेचा गुरूवारी पहाटे मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील ४३ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धुळे शहरातील १९ तर शिरपूर येथील १५ कोरोनाबाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे.