शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव दुचाकी घसरून एकाचा मृत्यू, शिरपूर तालुक्यातील तरडी गावाजवळील घटना

By देवेंद्र पाठक | Updated: February 8, 2024 16:36 IST

मच्छिंद्र मोहन शिरसाठ (वय ४९) असे मयत व्यक्तीचे नाव आहे

देवेंद्र पाठक, धुळे: भरधाव वेगाने असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने उपचार घेताना मृत्यू झाला. ही घटना शिरपूर तालुक्यातील तरडी गावाच्या शिवारात सोमवारी पहाटे झाली होती. बुधवारी थाळनेर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली. मच्छिंद्र मोहन शिरसाठ (वय ४९, रा. भावेर, ता. शिरपूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

भरधाव वेगाने असलेल्या दुचाकीचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरली. अपघाताची ही घटना शिरपूर तालुक्यातील तरडी गावाच्या शिवारातील पाटचारीजवळ साेमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. दुचाकीवरील चालक मच्छिंद्र मोहन शिरसाठ हे भावेर गावाकडून तरडी गावाकडे येत असताना दुचाकीसह दूरवर फेकले गेले. यात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. फेकल्या गेल्याने मच्छिंद्र यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली. बराच वेळ ते अपघातस्थळी विव्हळत पडून होते. रस्त्त्यावरून वावरणाऱ्यांच्या लक्षात हीबाब येताच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.दुचाकीची नंबर प्लेट तुटल्यामुळे सुरुवातीला त्यांची ओळख पटली नाही. पण मोटार सायकलीच्या चेसिस नंबरवरुन ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी बुधवारी थाळनेर पोलिस ठाण्यात गौतम मोहन शिरसाठ यांनी दिलेल्या माहितीवरून मोटारसायकल चालक मयत मच्छिंद्र मोहन शिरसाठ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक दीपक पावरा घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात