धुळे : कोरोनाचा संक्रमण वाढत असताना मात्र उन्हाचा फटकाही धुळेकरांना सहन करावा लागत आहे़ त्यामुळे एका दुचाकीस्वाराने शक्कल लढवून आपल्या दुचाकीलाच छत्री बांधून घेत स्वसंरक्षण करण्यासाठी पाऊल उचलले आहे़कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत़ नागरीकांना देखील वेळोवेळी आवाहन करुन घरातच थांबण्याचे सांगितले जात आहे़ मात्र अत्यावश्यक सेवेसाठी नागरीकांना बाहेर पडावे लागत आहे़ त्यामुळे तोंडाला मास्क लावत एका दुचाकीस्वाराने आपल्या दुचाकीलाच छत्री अडकवून घेतली आहे़ त्यामुळे काही प्रमाणात का असेना तळपत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी सुरु असलेली धडपड सध्या धुळ्यात चर्चेचा विषय ठरलेला आहे़
कोरोनासोबतच आता उन्हापासून बचावासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 21:37 IST