शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हयातील २१ ग्रामपंचायतींना नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 21:35 IST

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पाहणी : दूषित पाणी, घाणीचे साम्राज्य आढळले

ठळक मुद्देपावसाळयानंतर पुन्हा होणार सर्वेक्षण जिल्हयात स्वच्छ सर्वेक्षण पावसाळयानंतर पुन्हा केले जाणार आहे. हे सर्वेक्षण १ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत केले जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, ज्या ग्रामपंचयतींना नोटीसा बजविण्यात आल्या आहेत, त्या ग्रामपंचायतींनी गावात स्वच्छता करावी; असे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे केलेल्या पाहणीत जिल्हयातील २१ गावांमध्ये दूषित पाणी, घाणीचे साम्राज्य व अन्य कारणे आढळून आली. त्यामुळे जि.प. प्रशासनातर्फे संबंधित २१ गावांच्या ग्रामपंचायतीला नोटीसा बजविण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक जिल्हयात स्वच्छ सर्वेक्षण करण्यात आले. धुळे जिल्हयातही १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे सर्वेक्षण करण्यात आले होते. महिनाभर चाललेल्या सर्वेक्षणात जिल्हयातील २१ गावांमध्ये दुषित पाणी आढळून आले. तसेच या गावांमध्ये पाण्याची टाकीची दुरवस्था, जलवाहिन्यांना गळती, ठिकठिकाणी उकीरडा पडल्याची विदारक स्थिती आढळून आली. त्यानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे संबंधित सर्व गावांच्या ग्रामपंचायतींना नोटीसा देण्यात आल्या आहेत. या सर्व ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड वाटप करण्यात आले आहे.  या कार्डमध्ये सर्वेक्षणात संबंधित गावांमध्ये ज्या त्रुटी आढळून आल्या आहे. त्याचा उल्लेख करण्यात आला असून गावांमध्ये आढळून आलेल्या त्रुटी तत्काळ दूर कराव्यात, असे निर्देश संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे. तसे ग्रामपंचायतींनी केले तर ग्रामपंचायतींना ग्रीन कार्ड दिले जाणार आहे. या ग्रामपंचायतींना दिल्या नोटीसा धुळे : नवलाणे, देउळ खुर्द, बांभुर्ले, शिरडाणे प्र. ने, खंडलाय बुद्रूकसाक्री : बसरावळ, बोपखेल, कुडाशी, मळगाव, सुकापूर, शेवगे, विरखेल, कासारे, तामसवाडी, मालनगाव, घोडदेशिंदखेडा : सोनेवाडी, वरपाडा, सुकवदशिरपूर : उंटावद व सावळदे 

टॅग्स :zpजिल्हा परिषदDhuleधुळे