शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

धुळ्यात मोटरसायकल रॅलीतून अहिंसा, शांतीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 17:31 IST

महावीर जयंती : श्री सकल जैन समाज व नवकार मंडळातर्फे विविध कार्यक्रम

ठळक मुद्देगुरुवारी, २९ रोजी महावीर भगवान जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने दुधेडिया हायस्कूल येथे सकाळी सात वाजता ध्वजवंदन, प्रार्थना होणार आहे.सकाळी नऊ वाजता जैन मंदिरपासून भव्य शोभायात्रा निघणार आहे. याप्रसंगी रांगोळी स्पर्धा, कलश स्पर्धा व इतर उपक्रम घेण्यात येतील. यानंतर जैन समाजासाठी नवकारशीचा कार्यक्रम दुधेडिया हायस्कूल येथे होणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन राजेंद्र सिसोदीया, दिलीप कुचेरिया, डॉ. आनंद ताथेड, उज्ज्वल दुग्गड, प्रवीण कुचेरिया, महेश बाफना, अजित चोरडिया, विशाल ढोलीया, विशाल मल्हारा करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : श्री भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव २०१८ निमित्ताने बुधवारी सकाळी श्री सकल जैन संघ, नवकार मंडळातर्फे अहिंसा चौकातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीत सहभागी जैन समाजबांधवांनी अहिंसा व शांतीचा संदेश दिला. रॅलीत शहरातील हजारो जैन समाजबांधव सहभागी झाले होते. शहरातील अहिंसा चौकातून रॅलीला सुरुवात झाली. पुढे ही रॅली पारोळारोड, ८० फुटी रस्ता, मालेगावरोड, अग्रसेन चौक, चाळीसगावरोडमार्गे जुना आग्रारोड, महात्मा गांधी पुतळा, दत्त मंदिर चौकमार्गे जयहिंद कॉलनी परिसर, गल्ली दोन नंबर २ येथील जैन मंदिरापर्यंत आली. त्यानंतर ही रॅली साक्रीरोडवरील जैन मंदिरापर्यंत आली. तेथे रॅलीचा समारोप झाला. भरगच्च कार्यक्रम यानिमित्ताने  बसस्थानक, मार्केट यार्ड, खंडेराव बाजार येथे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी रेल्वे स्टेशनरोडवरील हिरे भवनात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ‘लूक अ‍ॅन लर्न’ च्या वतीने नाटीका, नृत्य व एकांकीका सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष सुनील मुथा, मुन्नाभाऊ घी वाले, अ‍ॅड. राजेश मुणोत, अध्यक्ष संतोष पाटणी, पवन पाटणी, राजेंद्र सिसोदीया, दिलीप कुचेरिया, रवींद्र पाटणी, कमलेश गांधी, राजू बाफना, अ‍ॅड. आनंद ताथेड, विजय दुग्गड, उज्ज्वल दुग्गड, राजेंद्र बंब, सुनील खिलोसीया, किशोर शहा, दिलीप पारख, विशाल मल्हारा, दिनेश भंडारी, राहुल साभद्रा यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :DhuleधुळेJain Templeजैन मंदीर