कोणतेही आरक्षण निघाले तरी सरपंच आपलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 02:21 PM2020-12-24T14:21:02+5:302020-12-24T14:21:27+5:30

साक्री तालुका :सर्वसमावेशक पॅनल तयार करण्यासाठी गावपुढाऱ्यांची धावपळ

No matter what the reservation is, the sarpanch is yours | कोणतेही आरक्षण निघाले तरी सरपंच आपलाच

dhule

Next

स्पेशल रिपोर्ट  : सुनील बैसाणे
धुळे : साक्री तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. असे असले तरी तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींच्या गावांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत अनपेक्षीत शांतता होती. तालुक्यातील महत्वाच्या ग्रामपंचायतींचा दाैरा केला असता सर्वत्र सामान्य परिस`थिती दिसली. सरपंचपदाचे आरक्षण नसल्याने गावपुढाऱ्यांपुढे पॅनल तयार करण्याचा मोठा पेच निर्माण झाल्याचे जाणवले.
गावपातळीवर पक्षीय राजकारणाला फारसे महत्व नसते. असे असले तरी तीन पक्षांची महाविकास आघाडी, भारतीय जनता पार्टीच्या आमदार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचा भाजप प्रवेश यामुळे साक्री तालुक्याची राजकीय समिकरणे नक्कीच बदलली आहेत. सरपंचपदाचे आरक्षण नसल्याने प्रस`थापितांसह गावपुढाऱ्यांची गणिते बिघडली. म्हणूनच यंदा कोणत्याच गावात निवडणुकीचे वातारवण पहायला मिळाले नाही. कोणत्याही प्रवर्गाचे आरक्षण निघाले तरी सरपंचपद आपल्याच पॅनलला मिळावे यासाठी सर्व प्रवर्गाच्या महिला, पुरुष उमेदवारांचा समावेश असलेल्या सर्वसमावेशक पॅनलची बांधणी करण्यात प्रस्थापित पॅनल प्रमुख गुंतले आहेत. 
विटाई ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ९ आहे. मागच्या निवडणुकीत या गावात तीन पॅनल रिंगणात होते. यंदा तूर्त शांतता दिसली.  इच्छूक उमेदवार चाचपणी करीत आहेत. गावात भाऊबंदकीवर राजकारण चालते. अंतर्गत व्युव्हरचना सुरू आहे. परंतु पत्ते कुणीही खुले केलेले नाहीत. त्यामुळे गावकरी देखील संभ्रमात आहेत.
बेहेड ग्रामपंचायतीवर देखील ९ सदस्य निवडून जातात. निवडून आल्यानंतर सरपंचपदाचा कालावधी वाटून घेतला जातो. बिनविरोध निवडणूक कधीही झाली नाही किंवा त्यासाठी प्रयत्न देखील होताना दिसत नाहीत असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या निवडणुकीत तीन पॅनल रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यंदा इच्छूकांची सख्या जास्त असणार आहे. खरे गणित उमेदवारांची अंतीम यादी जाहीर झाल्यावरच स्पष्ट होईल .
दातर्ती येथे प्रस्थापित सध्या गुपचुप चाचपणी करीत आहेत. मावळत्या सदस्यांपैकी अजुन कुणीही बाहेर आलेले नाही. परंतु नवख्या इच्छूकांनी मात्र जोरदार तयारी सुरू केली आहे. ग्रामपंचायतीची थकबाकी नसल्याचे ८ दाखले सोमवारपर्यंत वितरीत झाले होते.  दातर्ती गावात ४ वार्ड आणि ११ सदस्य संख्या आहे. असे असताना गावात निवडणुकीचे वातावरणच दिसले नाही.
११ सदस्यसंख्या असलेल्या शेवाळी गावात देखील निवडणुकीचे वातावरण नाही. आतापर्यंत १३ जणांनी दाखले नेले आहेत. मागणच्या निवडणुकीत एक महिनाअगोदर वातावरण तापले होते. परंतु यावेळी मात्र निवडणूक आहे की नाही असा संभ्रम निर्माण व्हावा इतकी शांतता आहे.
दिघावे ग्रामपंचायतीवर १३ सदस्य निवडून जाणार आहेत. परंतु त्यापैकी तीन जागा बिनविरोध होतील अशी जोरदार चर्चा गावात आहे. या गावात इच्छूक उमेदवारांनी आधीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शेतशिवारांमध्ये बैठका सुरू आहेत.
दुसानेत तरुणांचे कडवे आव्हान
सध्या निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतीपैकी सर्वात मोठ्या म्हणजे १७ सदस्यसंख्या असलेल्या दुसाने गावातील तरुण प्रस्थापितांसमोर कडवे आव्हान उभे करणार असल्याची चर्चा आहे. 
गेल्यावेळी दुसाने ग्रामपंचातीची निवडणूक बिनविरोध पार पडली होती. परंतु त्यावेळी दोन्ही गटात झालेली चर्चा कालांतराने फिसकटली आणि महिला सरपंचांना पायउतार व्हावे लागले. सत्तेसाठी मोठे राजकारण झाल्याचे गावकरी सांगतात. त्यामुळे यंदा दोन्ही गटांनी कंबर कसली आहे. 
५७ वर्षांची परंपरा खंडीत होण्याची शक्यता
मलांजन ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गावातील काही तरुणांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याने बिनविरोध निवडणुकीची तब्बल ५७ वर्षांची परंपरा खंडीत होण्याची भिती गावऱ्यांनी व्यक्त केली. परंतु असे हाेवू नये यासाठी ज्येष्ठांनी पुढाकार घेतला आहे. मलांजन ग्रुपग्रामपंचायतीमध्ये पक्षीय राजकारणाला महत्व न देता भाऊबंदकीमधून प्रत्येकी एक सदस्य देवून बिनविराेध निवडणूक होते. परंतु यावेळी तरुण इच्छूकांची संख्या वाढल्याने ज्येष्ठांची कसरत होणार आहे. असे असले तरी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्धार ज्येष्ठांनी केला आहे.  माळमाथा परिसरातील आदर्श समजल्या जाणाऱ्या मलांजन गावाच्या या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: No matter what the reservation is, the sarpanch is yours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे