सत्काराच्या कार्यक्रमास आदर्श माध्यमिक विद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष अजितचंद्र शहा, माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, माजी पंचायत समिती उपसभापती रवींद्र ठाकरे, जैताणे ग्रामपंचायत सरपंच कविता मुजगे, निजापूरचे उपसरपंच महेंद्र वाणी, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग राष्ट्रीय सचिव ताहिर बेग मिर्झा, निजामपूर पोलीस निरीक्षक वसावे, ग.स. बँक संचालक प्रकाश बच्छाव, निजामपूर ग्रामपंचायत सदस्य पुष्पा प्रकाश बच्छाव, रेशन दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप पवार, सदस्य रमेश कांबळे, तेजस जयस्वाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कारार्थींमध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक केवबा सूर्यवंशी, माध्यमिक विद्यालय बळसाणे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कल्पना सावंत, जि.प. शाळा, खुडाणे यांच्याससह १३ जणांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय ग.स. बँक संचालकपदी बिनविरोध निवडून आलेले प्रकाश बच्छाव यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला, तसेच आदर्श शिक्षिका कावेरी सोनवणे (जि.प. शाळा, उभरांडी), आदर्श शिक्षक पावबा बच्छाव (जि.प. शाळा, वाजदरे), आदर्श शिक्षक रामचंद्र भलकारे (जि.प. शाळा, खुडाणे) यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.