Nakna lake reservoir will be available at the end of June | नकाणे तलावातील जलसाठा जूनअखेर पुरणार 
dhule


धुळे : शहरावर ऐन पावसाळयात पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची चिन्हे असून नकाणे तलावात सध्या ४५ टीएमसी जलसाठा शिल्लक असून तो  जुनपर्यत पुरेल़ मात्र उशिरा पाऊसाची सुरूवात झाल्यास मनपाला शहरातील विहीरी, हातपंप, जेटपंप सुरू करावे लागतील़ 
 तापीवरील सुलवाडे बॅरेज, हरण्यामाळ व नकाणे तलावातून पाणीपुरवठा केला जातो़ त्याचप्रमाणे आपत्कालिन परिस्थिती उद्भविल्यास अक्कलपाडा प्रकल्पातूनही पाणी घेतले जाते़ सद्यस्थितीत अक्कलपाडा प्रकल्पात जलसाठा शिल्लक आहे़
  तर नकाणे तलावातील जलसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे़ तर तापी जलस्त्रोतात पुरेसे पाणी उपलब्ध आहे़ नकाणे तलावातील पाणीसाठा संपुष्टात आल्यास मनपाला तापी  योजनेवरून शहराला पाणीपुरवठा करावा लागणार आहे़ त्यामुळे मनपा प्रशासनाची चिंता वाढली आहे़ पुढील आठ दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही़ संपूर्ण शहराला तापी योजनेवरून पाणीपुरवठा करावा लागणार आहे़  उपलब्ध पाणी जूनपर्यंत पुरवण्याचे नियोजन महापालिकाने केले आहे. दुसरीकडे काही दिवसांपासून उन्हाचा प्रकोप वाढला आहे. तलावातील पाण्याचे वेगात बाप्पीभवन होत असल्याने पाणीसाठा कमी होत आहे. टंचाईमुळे पाणी काटकसरीने वापरीयची गरज  आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील वरखेडी फाट्याजवळ जलवाहिनीच्या व्हॉल्वची लोखंडी तबकडी निघाल्याने लाखो लीटर पाणी पांझरा नदीपात्रात वाहून वाया जात आहे़ याकडे दुर्लक्ष होत आहे़ 


नियोजन करण्याची गरज
सध्याच्या स्थितीत शहरातील विविध भागात चौथ्या तर कुठे पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे़ उन्हाची तिव्रता वाढत असताना अशा प्रकारे पाणी वाया जाणे हे प्रशासनाला परवडणारे नाही. दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करायला हवी़ काही नव्या योजनांवरही अंमल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 


Web Title: Nakna lake reservoir will be available at the end of June
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.