शिरपूर : तालुक्यातील कळमसरे गावात उसनवारीचे दोनशे रुपये दिले नाहीत म्हणून सुरेश गुमानसिंग पावरा याने धर्मा अभिमन भिल या तरुणाचा गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान घडली़खून केल्यानंतर सुरेश पावरा फरार झाला़ गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग केला़ परंतु तो हाती आला नसल्याचे सांगण्यात आले़ दरम्यान, याप्रकरणी मयत तरुणाची भावजई भुरीबाई जंगल भिल हीच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे़
कळमसरे गावात तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 21:36 IST