दिव्यांगांना लाभार्थ्यांना भाजप दिव्यांग विकास आघाडीच्या प्रयत्नांमुळे यापूर्वी पाच टक्के निधी मिळाला आहे; पण आता हा निधी वेळेवर मिळत नसल्यामुळे दिव्यांगांमध्ये नाराजी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी त्या-त्या वर्षाअखेरीस खर्च करणे बंधनकारक आहे. त्यानंतरही मनपाने दिव्यांगांसाठी पाच टक्के राखीव निधी खर्च केला नाही. या विषयाकडे लक्ष देण्यात यावे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक कागदपत्रे आस्थापना विभागात जमा करण्यात आली आहेत. त्यामुळे महापालिकेने याविषयी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजप दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील घटी, दगडू गवळी, भटू सूर्यवंशी, दिनेश वाघ, सुरेश ठाकरे, संतोष सैंदाणे, संतोष जाधव, यशवंत पाटील, संजय पाटील, दीनानाथ देशमुख, कृष्णा गवळी, गीता कटारीया, विनोद पवार, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
महापालिकेने दिव्यांगांवर पाच टक्के निधी खर्च करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:22 IST